Friday, July 5, 2024

चारू असोपाने व्हिडीओ शेअर करून राजीव सेनची उडवली खिल्ली, पाहा भन्नाट व्हिडिओ

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिची मेहुणी अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या नात्यात दिवसंदिवस वाढ होत आहे. लग्न झाल्यापासून दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. याआधी दोघांनीही त्यांच्या नात्याला संधी देण्याचे बोलले होते. पण दोघेही जास्त काळ एकत्र राहू शकले नाहीत आणि शेवटी पुन्हा वेगळे झाले. आता चारूनेही राजीवला घटस्फोट देण्याचे ठरवले आहे.

अभिनेत्री चारू असोपा (charu asopa) हिने पती राजीव (rajiv sen) याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना खुद्द राजीव सेन यांनीही चारूला चुकीचे म्हटले आहे. अलीकडेच त्याने अभिनेता करण मेहरा (karan mehra) आणि चारू यांच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावर करणने आपल्याला या प्रकरणात विनाकारण ओढले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या सर्व गोष्टी पाहता चारू आणि राजीवचे नाते आता धोक्यात आल्याचे दिसते. राजीव यांच्यावरील आरोपांनंतर चारूने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. नुकताच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर मुलगी जियानासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

अलीकडेच चारूने राजीव सेन यांना चोख प्रत्युत्तर देत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या रीलमध्ये ती तिची मुलगी जियानासोबत दिसत आहे. चारू हा रील बनवून खूप आनंदी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती म्हणते की, “या जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणे. त्यामुळे आनंदासाठी जी काही संधी मिळेल ती जाऊ देऊ नका. जो देतो त्याचे प्रेम स्वीकारा आणि जो देत नाही त्याची काळजी करू नका.”

हा व्हिडीओ पाहून चारूने थेट हावभावांमध्ये राजीव सेन यांना टोमणे मारल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राजीवने अभिनेत्रीवर जे आरोप केले आहेत, त्यावरून अभिनेत्रीने त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या हातावर रंगली मेहंदी, सोशल मीडियावर फोटो होतेय तुफान व्हायरल

बिग बॉसपूर्वीच शिवने जिंकले होते सलमान खानचे मन, म्हणून मिळालं…

हे देखील वाचा