Monday, February 10, 2025
Home बॉलीवूड एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लग्नात पोहोचली सुष्मिता सेन, ट्रोल्सने विचारले, ‘ललित मोदी आले नाहीत?’

एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लग्नात पोहोचली सुष्मिता सेन, ट्रोल्सने विचारले, ‘ललित मोदी आले नाहीत?’

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या व्यवसायिक आयुष्यसाेबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळेही चर्चेत असते. अलीकडेच सुष्मिता सेन एका लग्नात गेली हाेती. विशेष म्हणजे या लग्नात अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल हाही होता. मग काय राेहमन आणि सुष्मिताचे फाेटाे साेशल मीडियावर अशाप्रकारे व्हायरल झाले की, युजर्सने सुष्मिताला चांगलेच ट्राेल केले.

ट्रोलर्सला आली ललित माेदींची आठवण
सुष्मिता सेन (sushmita sen) तिच्या खास डॉक्टर हृषिकेश पै यांच्या मुलीच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी रोहमन शॉलही तिच्यासाेबत होता. बऱ्याच दिवसांनी अभिनेत्री पुन्हा एकदा रोहमन (rohman shawl) सोबत दिसली असल्यानं जेव्हा लग्नाच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा ते लोकांच्या चर्चेचा विषय ठरले. अशा वेळी ट्रोलर्सला  ललित मोदींची फार आठवण आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर असे काही फाेटाे समोर आले की, लगेच व्हायरल होते. सुष्मिताचा रोहमनसोबतचा हा फोटो व्हायरल झाला तेव्हा एका युजरने कंमेट करत लिहिले की, “ललित मोदी आले नाहीत.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “ललित मोदींची आयटम दिसली …” अशाप्रकारे युजर्सने पाेस्टवर विविध कमेंट्स केल्या आहेत. सुष्मिता रोहमनपासून फार पूर्वीच वेगळी झाली आहे. पण तरीही दोघांची भेट होते. ते लग्नात एकत्र दिसले तेव्हा लोकांना त्यांचे जुने फोटो आठवलेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

काही काळापूर्वी ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो शेअर केले होते. दोघांच्या या फोटोंनी इंटरनेट विश्वात धुमाकूळ घातली हाेती. सुष्मिताच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर सुष्मिता सेन सध्या ‘ताली’ या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ही सीरिज ट्रान्सजेंडर आणि सामाजिक कार्यावर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘या’ दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ‘ब्रह्मास्त्र’

उर्वशीच्या गळ्यात रिषभ पंतची चेन? फाेटाे पाहून चाहतेही झाले कनफ्यूज

हे देखील वाचा