Friday, July 5, 2024

राजीवने चारुच्या वाढदिवशी केली अशी काही पाेस्ट की, युजर्स संतापूण म्हणाले, ‘कधी तुमचा घटस्फोट…’

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा त्यांच्या नात्यामुळे कायमच चर्चेत असतात. दोघेही अनेकदा मुलाखतीदरम्यान एकमेकांवर टीका करताना दिसतात, तर कधी लग्नात एकत्र नाचताना दिसतात, ज्यामुळे त्याचे चाहते संभ्रमात आहेत. अशात आता अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे. या फोटोंमध्ये दोन्ही कपल आपली मुलगी जियानासोबत मस्ती करताना दिसत आहेत.

आज म्हणजेच मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी)ला चारूचा वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी राजीव सेन यानी त्यांच्या कुटुंबासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फाेटाेमध्ये राजीव सेन पत्नी चारू असोपा आणि मुलगी जियानासोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे चारू, तुला खूप प्रेम, उत्तम आरोग्यसह सदैव आनंदी रहा.” त्यांच्यातील प्रेमाचे बंध पाहून काही चाहत्यांनी दोघांचे कौतुक केले आहे, तर काही चाहते त्यांना ट्राेल करत आहे.

या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला.”, तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “आता भांडण करू नका, गाेष्टी घटस्फोटापर्यंत नेऊ नका. मुलीला आई आणि वडील दोघांचीही गरज असते.” अशाच काही युजर्स त्याच्या पोस्टवर कमेंट करत दोघांवर जोरदार टीका करत आहेत. एकाने युजरने कमेंट करत लिहिले की , “कधी तुमचा घटस्फोट हाेताे, तर कधी एकत्र येता. लग्नाची चेष्टा केली का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना चारू असोपा हिने सांगितले होते की, “त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.” ती म्हणाली, “आम्ही वेगळे होण्याचा निर्णय मागे घेतलेला नाही. आम्ही काउंसलिंगची मदत घेत आहोत आणि जूनपर्यंत सहा महिन्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीवर आहोत. राजीव आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाइम घालवत असल्याचा मला आनंद आहे”, असे चारूने म्हटले होते. (tv actress charu asopa husband rajeev sen celebrates actress birthday in style made her happy fans reacts on their photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सेल्फीच्या नावाखाली यामी गौतमच्या फॅनने काढला होता तिचा ‘तो’ व्हिडिओ, स्वतः सांगितला अनुभव

भाडं फुटलं रे! अखेर क्रितीने तिच्या सीक्रेट बाॅयफ्रेंडचा केला खुलासा, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा