Monday, July 1, 2024

शालीन भानाेतची एक्स पत्नी दुसऱ्यांदा अडकली विवाह बंधनात, फोटो व्हायरल

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर निखिल पटेलसाेबत लग्न बंधनात अडकली आहे. याचे फाेटाे खुद्द अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फाेटाेमध्ये नवविवाहीत जाेडप लग्नच्या विधी करताना दिसत आहेत. या जाेडप्याचे लग्न शनिवारी (दि. 18 मार्च)राेजी मुंबईत झाले, ज्यामध्ये अनेक कलाकरांनी हजेरी लावली हाेती

याआधी दलजीत कौर (dalljiet kaur) हिने तिच्या इन्स्टाग्रामवर नववधूच्या पोशाखातले फोटो देखील शेअर केले होते, जे चाहत्यांना खूप आवडले आहे. दलजीत कौरने पांढऱ्या रंगाच सुंदर लेहेंगा परिधान केला आहे, तर त्यावर लाल रंगाची सुंदर ओढनी ओढली हाेती, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. दलजीतचे लग्न हिंदू परंपरेनुसार झाले.

दलजीत कौरने तिचे लग्नातील सुंदर फोटो शेअर करण्यासोबतच लिहिले, ‘मिस्टर आणि मिसेस पटेल.’ त्यांचे हे फाेटाे इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल हाेत आहे. फाेटाेमध्ये ती निखीलसाेबत सात फेऱ्या मारताना दिसत आहे. यावेळी दोघेही खूप आनंदी आहेत, तर दुसऱ्या फोटोत दोघे बसून पूजा करत आहेत.

विशेष म्हणजे दलजीत कौरचे यापूर्वी शालीन भानोटसोबत लग्न झाले होते. तिला शालीनपासून एक मुलगाही आहे. मात्र, लग्नच्या काही वर्षानंतर दोघे वेगळे झाले. अशात आता दलजीत कौरचे निखिल पटेलसोबत लग्न झाले आहे. इन्स्टाग्रामवर दलजीत कौरच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.(tv actress dalljiet kaur and nikhil patel wedding photos goes viral on social media bigg boss 16 fame contestant seen very happy )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्फीच्या कपड्यांवर रणबीर कपूरचं माेठं वक्तव्य; म्हणाला, ‘अशा प्रकारच्या फॅशनचा…’

केआरकेला ‘या’ अभिनेत्याला ‘ड्रग अॅडिक्ट’ म्हणणे पडले महागात, तक्रारीवरून कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट

हे देखील वाचा