Saturday, July 26, 2025
Home व्हिडीओ गोपी बहूने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, एकदा व्हिडिओ पाहाच

गोपी बहूने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, एकदा व्हिडिओ पाहाच

साथ निभाना साथिया‘ फेम गोपी बहू उर्फ ​​देवोलिना भट्टाचार्जी या वर्षी लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहे. अभिनेत्रीने स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलालने पती शाहनवाज शेखला रंगवताना दिसत आहे.

देवोलीना भट्टाचार्जी (devoleena bhattacharjee) हिने तिच्या चाहत्यांना होळीच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर होळीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये देवोलिना हातात गुलाल घेऊन शाहनवाजला प्रेमाने रंगवताना दिसत आहे. दोघांनी अबीर आणि गुलालासोबत फुलांची होळी खेळली. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. सावधगिरीने होळी खेळा. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीना आणि शाहनवाज यांचे गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी लग्न झाले होते, त्यांचे लग्न अतिशय खाजगी ठेवण्यात आले. भव्य लग्नाच्या भानगडीत न अडकता, अभिनेत्रीने कोर्ट मॅरेज केले होते, ज्यामध्ये तिच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त काही खास मित्र उपस्थित होते. लग्नानंतर अभिनेत्रीनेही थाटामाटात लग्न न करता साधे लग्न करण्यामागचे कारण सांगितले. देवोलिना एका मुलाखतीत म्हणाली, “मी एक एनजीओ चालवते, जी वृद्धांची काळजी घेते. मला माझे पैसे अशाच गरजू लोकांसाठी खर्च करायचे आहेत आणि समाजाला आनंदी वातावरणात ठेवायचे आहे.”

ती पुढे म्हणाली, “मला वाटते की, तरुणांनी ही गाेष्ट समजून घ्यावी की, फक्त खास दिवसासाठी पैसे खर्च करणे आणि दिखावा दाखवणे ही एक मूर्ख कल्पना आहे… हा दिवस तेव्हाच खास बनतो जेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आशीर्वाद मिळतात, तुमचे मित्र तुमच्यासोबत असतात आणि तुम्ही परफेक्ट व्यक्तीशी लग्न करत असता.अर्थातच आम्ही सर्व विधी केले आणि आम्हाला खूप मजा आली.” असे देवाेलीनाचे म्हणणे हाेते.(tv actress devoleena bhattacharjee shares romantic video on her first holi celebration with husband shahnawaz shaikh )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी  

हाेळीच्या रंगात रंगली श्वेता शिंदे

हे देखील वाचा