Monday, June 9, 2025
Home मराठी वहिनीसाहेबांनी मुलासोबत केला भन्नाट डान्स, धनश्री काडगावकरच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

वहिनीसाहेबांनी मुलासोबत केला भन्नाट डान्स, धनश्री काडगावकरच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘कच्चा बदाम’ गाण्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हायरल गाण्याने सर्वांना अक्षरशः वेड लावले आहे. आतापर्यंत लाखो रिल्स या गाण्यावर तयार झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. आता मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरचा या गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यामध्ये तिचा मुलगा कबीरसुद्धा दिसत आहे.

मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर (dhanashri kadgaonkar) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा तिच्या  गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये ती तिच्या लेकासोबत डान्स करताना दिसत आहे.

या भन्नाट डान्सचा व्हिडिओ धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या छोट्या  कबीरसोबत डान्स करताना दिसत आहे. आईचा डान्स पाहून तो सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवत आहे. इतकेच नव्हे तर या डान्स मध्ये अचानक धनश्रीच्या पतीनेही सहभाग घेतला आहे. तो सुद्धा या व्हायरल गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये धनश्रीच्या डान्सवर चाहते फिदा झाले आहेत.

दरम्यान, धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेतील तिने साकारलेल्या नंदिताच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.या मालिकेत तिच्यासोबत हार्दिक जोशी, अक्षया देवधर यांनीही भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये नंदिताची भूमिका सर्वात जास्त लोकप्रिय ठरली. परंतू धनश्रीला गरोदरपणामुळे ही मालिका मध्येच सोडावी लागली होती. तिच्या जागी माधुरी पवारने ही भूमिका केली. मात्र धनश्रीने केलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा