टीव्ही अभिनेत्री हिना खान हिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. हिना खानचे चाहते तिची खूप काळजी घेतात. याच कारणामुळे हिनाच्या एका स्टेटसमुळे चाहते चिंतेत पडले आहे. हिना खानने एक स्टेटस पोस्ट केले होते, ज्यामध्ये तिने लेट नाईट थॉट शेअर केले होते. हे थाॅट पाहून तिच्या चाहत्यांना तिच्या ब्रेकअपची चिंता सतावू लागली. अनेकांनी हिनाला तिच्या इंस्टाग्रामवर ब्रेकअपबद्दल थेट प्रश्नही विचारला. मात्र, नंतर हिनानेही या स्टेटसची सत्यता तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. काय हाेते नेमके स्टेटस? चला जाणून घेऊया…
वास्तविक, हिना खान (hina khan) हिने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लेट नाईट थॉट्स हे स्टेटस शेअर केले होते, ज्यामध्ये हिना खानने लिहिले की, “फसवणूक हे एकमेव सत्य आहे जे कायमचे असते.” या स्टेटसनंतर लोकांनी असा अंदाज लावला की, हिना खानचे तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत ब्रेकअप झाले आहे. हिनाच्या या स्टेटसवर चाहत्यांनीही प्रश्न विचारायला सुरुवात केली. इतकंच नाही, तर हिना खानची मैत्रिण करिश्मा तन्ना हिनेही तिला मेसेज करून तिच्या नात्याबद्दल विचारलं.
ब्रेकअपच्या अफवांदरम्यान हिना खाननेही स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हिना खानने सांगितले की, “ब्रेकअपची बातमी अफवा आहे. माझे लव्ह लाईफ एकदम ठीक चालले आहे. हिनाने सांगितले की, तिने पोस्ट केलेले स्टेटस ही प्रमोशनल पोस्ट होती, ज्याचा तिच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत ती खूप खूश आहे.”
View this post on Instagram
हिना खानच्या या मुलाखतीनंतर तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हिनाने सांगितले की, “या स्टेटसनंतर अनेकांनी तिला मेसेज केले आहेत. ज्यांनी तिला ब्रेकअपबाबत प्रश्नही विचारले आहेत, ज्याचे उत्तर अभिनेत्रीनं दिले आहे.”
हिना खान हिच्या विषयी बाेलायचे झाले, तर तिला ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रचंड ओळख मिळाली.(tv actress hina khan opened up about break up rumors with boyfriend rocky jaiswal as she posted late night thoughts on her status)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विकी कौशल बनला शोस्टॉपर, फॅशन शोच्या रॅम्पवर पंजाबी गाण्यावर केला डान्स, प्रेक्षकांचा एकच जल्लाेष
‘हर हर महादेव’च्या वादावर सुबाेध भावेचा माेठा निर्णय; म्हणाला, ‘बापजन्मात काेणत्याही…’