Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने शोच्या निर्मात्यांवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. जेनिफरने प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मेकर्सवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

खरे तर, माध्यमांशी बातचीत करताना जेनिफरने सांगितले की, तिने 7 मार्चपासून शोसाठी शूट केलेले नाही आणि त्यामागील कारण देखील सांगितले. जेनिफरने सांगितले की, 6 मार्चला तिच्यासोबत असे काही घडले जे ती विसरू शकत नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तिचा वाढदिवस असल्याचे तिने सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “मला घरी जाऊ दिले नाही आणि प्रोजेक्ट मॅनेजरसह निर्मात्यांनी माझी गाडी थांबवली आणि मला धमकावले. मी त्यांना म्हणाली की, इतकी वर्षे मी या मालिकेत काम करत आहे, तुम्ही माझ्यासोबत हे करू शकत नाही. परुंतु त्यानंतरही त्यांनी मला धमकावले. मी तीन जणांविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.”

अभिनेत्रीने पुढे सांगितले, “7 मार्च रोजी मी होळीसाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली आणि म्हणाले की, मला 2 तास घरी जाऊ द्या. कारण, माझी मुलगी माझी वाट पाहत आहे. मात्र, त्यांनी मी साेडून सगळ्यांशी एडजस्टमेंट केली. मग माझ्या लक्षात आले की, हे महिलांसाठी काम करण्याची जागा नाही. प्रोजेक्ट मॅनेजरने मला चार वेळा सगळ्यांसमोर जाण्यास सांगितले आणि अतिशय उद्धटपणे बोलले. क्रिएटिव्ह पर्सनने माझी कार थांबवली आणि हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा सर्व प्रकार ७ मार्च रोजी घडला. मला वाटले हे लोक मला बोलावतील. पण असे झाले नाही.”

जेनिफर पुढे सांगितले की, “या लोकांनी मला नोटीस पाठवली की, तुझ्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला आहे. मी म्हणाली, उल्टा चोर कोतवाल को डांटे. त्यानंतर या लोकांनी मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मी त्याला मेसेज केला की, ‘हा लैंगिक छळ आहे.’ मात्र, या लाेकांनी माझ्यावर पैसे उकळण्याचा आरोप केला. मी तेव्हाच ठरवले होते की, मी त्यांना जनतेसमोर माफी मागायला लावेल.” अभिनेत्री पुढे म्हणाली की, “याआधीही माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.”

अभिनेत्रीने तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोपही केला होता. जेनिफर म्हणाली, “अनेकवेळा त्यांनी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण मी प्रत्येक वेळी ते सोडले. कारण, मी आवाज उठवला, तर माझे काम माझ्यापासून दूर गेले असते. किती वेळा मला घरी जाऊ दिले नाही, अनेक वेळा तक्रार करूनही यावर कारवाई झाली नाही.” असे जिनिफरने बातचीत दरम्यान सांगितले.( tv actress jennifer mistry bansiwal mrs roshan singh sodhi quits taarak mehta ka ooltah chashmah after 15 years accuses tmkoc maker of physical harassment )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ सुपरस्टारला करायची होती ‘जंजीर’मध्ये भूमिका, अनेक कलाकारांनी नकार दिल्यावर अशी झाली सिनेमात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

निळू फुले ते राजशेखर, ‘या’ कलाकारांनी आपल्या खलनायकी भूमिकेने गाजवली मराठी सिनेसृष्टी

हे देखील वाचा