Monday, June 24, 2024

‘या’ सुपरस्टारला करायची होती ‘जंजीर’मध्ये भूमिका, अनेक कलाकारांनी नकार दिल्यावर अशी झाली सिनेमात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या करियरमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जंजीर’ सिनेमाला प्रदर्शित होऊन आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 1973 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला अमिताभ यांच्या रूपात एक अँग्री यंग मॅन दिला. या सिनेमाने ना केवळ अमिताभ बच्चन यांच्या करियरला तर बॉलीवूडला देखील एक वेगळे वळण दिले. जंजीर सिनेमात अमिताभ यांनी इन्स्पेकटर विजयची भूमिका साकारली होती. या सिनेमाला पूर्ण होत असलेल्या 50 वर्षाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सिनेमाशी संबंधित काही रंजक किस्से सांगणार आहोत.

जंजीर नंतरच अमिताभ यांचे करियर अक्षरशः उडायला लागले होते. मात्र या सिनेमासाठी अमिताभ बच्चन कधीच निर्मात्यांची, दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हते. त्यांच्या आधी अनेक मोठमोठ्या दिग्गज सुपरस्टार कलाकारांना जंजीर ऑफर करण्यात आला होता. खुद्द धर्मेंद्र यांना देखील या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा होती. मात्र तसे झाले नाही. जंजीरमध्ये मुख्य भूमिकेसाठी अभिनेते प्राण यांनी प्रकाश मेहरा यांना अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले होते.

मेडियामधील एका रिपोर्टनुसार प्रकाश मेहरा यांच्या मुलाने पुनीतने सांगितले होते की, “धर्मेंद्र यांच्याकडे जंजीरची स्क्रिप्ट होती. त्यांनी प्रकाश मेहरा यांना हा सिनेमा दिग्दर्शित करण्याची ऑफर दिली होती. सिनेमात ते मुख्य भूमिका करणार होते. मात्र ते जवळपास एक वर्ष दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त झाले. प्रकाश मेहरा यांना त्यांची वाट पाहायची नव्हती म्हणून त्यानी ३५०० रुपयांमध्ये ती स्क्रिप्ट धर्मेंद्र यांच्याकडून विकत घेतली.”

हा सिनेमा प्रकाश मेहरा यांनी राज कुमार, देव आनंद आदी अनेक त्या काळातील सुपरस्टार अभिनेत्यांना ऑफर झाला. मात्र सर्वानी नकार दिल्यानंतर प्राण यांनी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले. मेहरा यांनी अमिताभ यांचा बॉम्बे टू गोवा सिनेमा पहिला आणि ते खुश झाले पुढे अमिताभ यांनी हा सिनेमा केला आणि इतिहास घडला.(zanjeer movie 50 years this actor was the first choice)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

‘जंगली रमीची जाहिरात करून…’, नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरचे रोखठोक उत्तर, म्हणाला…

हे देखील वाचा