Tuesday, June 25, 2024

टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात सहभागी होत केली नव्या इनिंगला सुरुवात

कलाकार आणि राजकारण हे खूप जवळचे आहे. अनेक कलाकार राजकारणात सक्रिय आहे, तर अनेक राजकारणी मनोरंजनात सक्रिय आहे. कलाकारांनी राजकारणात यावे हे काही आताच होते असे नाही. अगदी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सुनील दत्त, जयललिता आदींपासून ते आता नुसरत जहाँ, गुल पनाग, सनी देओलपर्यंत अनेक कलाकार राजकारणात सक्रिय आहेत. हे चित्रपटातील कलाकार जरी असले, तरी टेलिव्हिजनवरील कलाकार देखील राजकारणात सक्रिय असल्याची बरीच उदाहरणं आहेत. नुकतीच टेलिव्हिजनवर प्रसिद्ध खलनायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री काम्या पंजाबीने देखील राजकारणात प्रवेश केला आहे.

अभिनयामध्ये तुफान प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवलेल्या काम्याने आता तिच्या राजकारणाच्या इनिंगला सुरूवात केली आहे. काम्याने २७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्यकारी अध्यक्ष चरण सिंह सपरा, युवा नेता सूरज सिंह ठाकुर यांच्या उपस्थितीमध्ये काम्याने काँग्रेसचा हात धरला आहे.

काम्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक विषयांवर तिची मते परखडपणे मांडत असते. काम्या जेवढी तिच्या व्यायसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. काम्याला राजकारणात जाण्याची खूप इच्छा होती, मात्र तिचे काम आणि व्यस्त वेळापत्रकामुळे तिला ते शक्य होत नव्हते. आता तिची सुरू असणारी मालिका ‘शक्ती’ ही नुकतीच संपली आणि ती जरा फ्री झाली. त्यामुळे तिने आता राजकारणात प्रवेश केला आहे.

टेलिव्हिजनवरील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश होतो. काम्या पंजाबीने २००१ मध्ये तिच्या अभिनय करिअरची सुरूवात केली होती. काम्याने ‘कहता है दिल’, ‘क्यूं होता है प्यार’, ‘पिया का घर’, ‘अस्तित्व: एक प्रेम कहानी’, ‘वो रहने वाली महलों की’, ‘बनूं मैं तेरी दुल्हन’, ‘अंबर धरा’, ‘बेइंतेहा’ आदी अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहेत. याशिवाय तिने बिग बॉस च्या सातव्या पर्वात देखील सहभागी झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा