छोट्या पडद्यावरील ‘ये हैं मोहब्बतें‘ या प्रसिद्ध शोमधील अभिनेत्री कृष्णा मुखर्जी हिने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने सांगितले की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा करणार आहे. मात्र, यापूर्वीच कृष्णा मुखर्जीसोबत असे काही घडले, ज्याने तिच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या चेहऱ्याचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, तिच्यासोबत अचानक काय झाले आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवरून दिली माहिती
कृष्णा मुखर्जी (Krishna Mukherjee) हिने सांगितले की, तिच्या ओठांना इन्फेक्शन झाले आहे. साखरपुड्याच्या काही तासांआधीच तिच्या चेहऱ्याला इन्फेक्शन झाले. तिच्या ओठांजवळ सूज आली आहे. तिच्यासोबत असे झाल्याने ती चिंतेत पडली आहे. तिने इंस्टा स्टोरी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खरंच…? माझ्या साखरपुड्याच्या ठीक एक दिवस आधी हे झाले आहे.” यासोबतच अभिनेत्रीने एक इमोजीही शेअर केला आहे.
कधी होणार कृष्णाचा साखरपुडा?
कृष्णा मुखर्जी हिच्यासाठी ही वेळ जल्लोष करण्याची आहे. ती तिच्या लग्न आणि साखरपुड्याची तयारीमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने सांगितले होते की, ती बॉयफ्रेंडसोबत गुरुवारी म्हणजेच 8 सप्टेंबर, 2022 रोजी साखरपुडा करणार आहे. तसेच, 2023मध्ये ती लग्न करणार आहे.
कोण आहे कृष्णा मुखर्जी?
कृष्णा मुखर्जी (Who Is Krishna Mukherjee) हिच्याबद्दल बोलायचं झालं, तर ती पंजाबची आहे. तिने तिच्या कारकीर्दीची सुरुवात ‘झल्ली अंजली’ या टीव्ही मालिकेतून केली होती. यानंतर ती ‘आशिकी’मध्ये रेयांश भाटियाच्या विरुद्ध भूमिकेत होती. पुढे तिने ‘ट्विस्ट वाला लव्ह’, ‘एमटीव्ही बिग एफ’, ‘ये हैं मोहब्बतें’ आणि ‘नागिन 3’ यांसारख्या अनेक मालिकेत काम केले.
अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. तिला नृत्यांगना आणि कोरिओग्राफर बनायचे होते, ज्यासाठी ती लुधियानाहून दिल्लीला शिफ्ट झाली होती. त्या दिवसांत ‘चॅनल व्ही’च्या एका शोमध्ये काम करण्याची ऑफर तिला मिळाली आणि तिची निवड झाली. त्यानंतर अभिनेत्री मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर कृष्णाला बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करण्याची संधी मिळाली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पहिल्या दिवशी बक्कळ पैसा छापल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपटले ‘हे’ सिनेमे, ‘ब्रह्मास्त्र’चं काय होणार?
ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या ऐश्वर्याने सर्वांसमोर झुकून रजनीकांत यांना केला नमस्कार, पाहा व्हिडिओ
रिषभचा पत्ता कट! उर्वशी रौतेला झालीय ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात वेडी?