Friday, July 5, 2024

‘भाभी जी घर पर है’मधील नवीन ‘गोरी मेम’ सोडतेय मालिका? नेहा पेंडसेने सांगितले सत्य

कोरोना व्हायरसमुळे जवळपास सर्व क्षेत्रांची पुरती दैना झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेकांनी आपले काम गमावले आहे. चित्रपटसृष्टीलाही याचा फटका बसला आहे. टीव्ही मालिकांच्या शूटिंगही सध्या बंद आहेत. दुसरीकडे टीव्हीवर सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम ‘भाभी जी घर पर है’ आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. मालिकेमध्ये नवीन गोरी मेम म्हणजे अनिता भाभीची भूमिका साकारण्यावरून चर्चेत आलेली टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे ही मालिका सोडणार असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या आहेत.

नेहा पेंडसेच्या मालिका सोडण्याच्या अफवेने तिचे चाहतेही चिंतेत पडले आहेत. ‘भाभी जी घर पर है’मधील गोरी मेमची भूमिका साकारणाऱ्या नेहाने नुकतेच या अफवा फेटाळल्या आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नेहाने म्हटले की, “ही एक अफवा आहे, ज्यावर मला बिल्कुल आश्चर्य नाही. कारण मी मागील काही एपिसोड्समध्ये दिसले नव्हते. त्यामुळे लोकांना हा गैरसमज झाला.”

नेहाने स्पष्ट केले की, तिने मालिका सोडलेली नाही. लवकरच येणाऱ्या एपिसोडमध्ये ती दिसणार आहे. तिने हेही सांगितले की, ‘भाभी जी घर पर है’ची शूटिंग सूरतमध्ये केली जात आहे. तिथे ती लवकरच पोहोचेल. संपूर्ण कास्ट आणि क्रू  मेंबर्स एका हॉटेलमध्ये शूटिंग करतील, जिथे बायो- बबल बनवले जाईल.

नेहाने असेही सांगितले की, “मालिकेत मी न दिसल्यामुळे अनेकांनी मला मेसेज केले. ते सर्वजण मला स्क्रीनवर मिस करत आहेत. मला त्यांना समजवावे लागले की, मी लवकरच परत येईल.”

“सुरुवातीला लोकांनी माझी तुलना ती भूमिका साकारणाऱ्या जुनी अभिनेत्रीशी केली होती. या तुलनेसाठी मी तयार होते. परंतु आता मला या भूमिकेत चांगल्याप्रकारे स्वीकारले आहे आणि मीदेखील आपल्या भूमिकेत पूर्ण बुडाले आहे,” असे पुढे बोलताना अभिनेत्रीने सांगितले.

नेहा ही मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘नटसम्राट’, ‘सूरज मंगल पे भारी’, ‘तुम से अच्छा कौन है’, ‘देवदास’ यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटात झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकदम जबराट! एंजेलिना जोलीने केले सर्वात खतरनाक फोटोशूट; तब्बल १८ मिनिटे शरीरावर होत्या मधमाश्या

-गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम

-जेव्हा शाहरुख खान मनोज वाजपेयीला पहिल्यांदा घेऊन गेला होता डिस्कोमध्ये; शेअर करायचे सिगारेट अन् बिडी

हे देखील वाचा