Monday, April 15, 2024

जेव्हा शाहरुख खान मनोज वाजपेयीला पहिल्यांदा घेऊन गेला होता डिस्कोमध्ये; शेअर करायचे सिगारेट अन् बिडी

बॉलिवूडमधील कलाकार ऑनस्क्रिन जेवढे मोकळे पणाने वागतात तेवढेच ऑफस्क्रीन देखील वागतात. यात समावेश होतो तो म्हणजे बॉलिवूडमधील रोमान्स किंग शाहरुख खान आणि मनोज वाजपेयी यांचा. त्यांच्यामधील मैत्री आपल्याला वारंवार दिसली आहे. तसे त्यांनी खूप कमी चित्रपटात एकत्र काम केले आहे. मनोजच्या एका मुलाखतीतून असे समोर आले आहे की, त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. त्या दोघांनी ‘वीर झारा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मनोजने सांगितले की, या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली ओळख झाली होती.

त्या दरम्यान शाहरुख खान आणि मनोज वाजपेयी हे खूप चांगले मित्र झाले होते. ते एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करत होते. शाहरुख खान हा पहिला व्यक्ती होता जो मनोज वाजपेयीला पहिल्यांदा डिस्कोमध्ये घेऊन गेला होता. मनोजने सांगितले की, “आम्ही त्या काळात खूप तरुण होतो त्यामुळे कोणत्याही गोष्टी घेऊ शकत होतो. तसेच आम्ही सगळं शेअर करायचो. अगदी सिगारेट, बिडी हे सगळं.”

इतर लोकांप्रमाणेच मनोज वाजपेयी देखील म्हणतो की, शाहरुख खानची पर्सनलीटी खूप चार्मिंगआहे. यामुळेच तो मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील मुलींची संख्या खूप जास्त आहे. मनोज वाजपेयी हा लवकरच त्याच्या आगामी ‘फॅमिली मॅन 2’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत समंथा अक्किनेनी देखील असणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा खूप दिवसापासून कोणता मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. शेवटाचा तो ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. परंतु त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्याचे चाहते आता त्याचा आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे.(shahrukh khan took manoj bajpayee to disco in first time)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट
कॅलिफाेर्नियात सुट्टयांचा आनंद घेताना मृण्मयी देशपांडे, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा