Saturday, November 23, 2024
Home अन्य ‘काही तरी लाज वाटूदे’, म्हणत मोनोकनीमधील बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी

‘काही तरी लाज वाटूदे’, म्हणत मोनोकनीमधील बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी

कलाकारांचे पडद्यावरील आयुष्य आणि खासगी आयुष्य यात जमीन- आस्मानाचा फरक असतो. पडद्यावर कलाकार ज्याप्रमाणे वागतात किंवा भूमिका साकारतात, तसे ते आपल्या खऱ्या आयुष्यात नसतात. मात्र, कलाकारांना अनेकदा यावरून ट्रोल केले जाते. असेच काहीसे टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ मालिकेत प्रीता या भूमिकेत संस्कारी सून म्हणून घराघरात आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री श्रद्धा आर्यासोबत घडले आहे. श्रद्धा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सूट, साडी आणि लेहंग्यातील फोटो शेअर करणाऱ्या श्रद्धाने नुकतेच मोनोकनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे पाहून आता नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

श्रद्धाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये ती मोनोकनी घालून शॉवर घेताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या मोनोकनीमध्ये श्रद्धाचा बोल्ड अंदाज नक्कीच धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत.

श्रद्धाचा हा अवतार अनेकांना आवडला नाही. काहीजण तिला ‘हृदयाची राणी’ म्हणत आहेत, तर काहीजण ‘क्यूट आणि हॉट’ सांगत आहेत. दुसरीकडे काहीजण तिचा हा अवतार पाहून चांगलेच तापले आहेत. ‘कुंडली भाग्य’मधील प्रीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला नेटकरी सोशल मीडियावर संस्काराचे धडे दिले जात आहेत.

फोटो पाहून युजर्स वाईट कमेंट करत ‘लाज नसलेली आणि बिघडलेली’ म्हणत आहेत. एका युजरने म्हटले की, “प्रीता बेटा तू या कपड्यांमध्ये संस्कारी दिसत नाहीस. काही तरी लाज वाटूदे.”

 

खरं तर गोव्यात लॉकडाऊन असल्यामुळे श्रद्धा हॉटेलमध्येच अडकली आहे. अशामध्ये श्रद्धा शॉवरमार्फत स्वत:ला कूल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॅलेंटाईन डेवर जेव्हा श्रद्धाने आपला एक बिकिनी फोटो शेअर केला होता, तेव्हाही काही युजर्सनी तिला ट्रोल केले होते. ट्रोलर्सनी तिला म्हटले होते की, ‘तुला कपडे घालण्याची अक्कल नाही.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा