Monday, July 1, 2024

राखी भडकली मुंबई पाेलिसांवर; म्हणाली, ‘सेलिब्रिटींना न्याय देऊ शकत नाही, सामान्य माणसाला…’

राखी सावंत हिच्या आयुष्यात सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. अशात राखी तिच्या डान्स अकादमीसाठी दुबईत गेली. यादरम्यान, तिने चाहत्यांना तिचा पती आदिल खान दुर्रानीच्या केसबद्दल नवीन अपडेट देण्यासाठी इंस्टाग्रामवर लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओच्य सुरुवातीला राखीने सांगितले की, तिच्या आईचे निधन होऊन एक महिना झाला आहे. आणि त्यासाेबतच तिच्याकडे एक वाईट बातमी आहे. काय आहे ती बातमी? चला जाणून घेऊया…

राखी सावंत म्हणाली, “आदिलने त्या इराणी मुलीला बाेलवले, जिने त्याच्यावर बला’त्कारचा आराेप केला हाेता. आदिल तिला म्हणाला की, ‘ताे राखीला घटस्फाेट दिल्यानंतर तिच्याशी लग्न करेल. पुढे आदिलने तिला त्याच्यावरील केस मागे घेण्यास सांगितले.’ आदिलने मला फोनही केला होता, त्यामुळे मला म्हैसूर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि सांगितले की, तो सर्वांनाच सोडून माझ्यासोबत सेटल होईल.”

यावर राखी म्हणाली, “आदिल, तू मूर्ख आहेस, तू चूक करतोय. तु प्रत्येक स्त्रीला हेच म्हणताे. तू तुरुंगात आहेस. तु माझ्यासह इतर स्त्रियाला मुर्ख बनवायचं थांबव. मी तुझ्यावर तक्रार दाखल करेल आणि तु माझी फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करेन. तू माझ्याशी कोर्ट मॅरेज केलंस, लग्न केलं.”

अभिनेत्री म्हणाली, “मला किती छळणार? तू मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहेस. मला माझ्या आईचे आणि देवाचे आशीर्वाद आहेत. तू जितका पाडशिल मी तितकी उठेन. तु मला कितीही खाली पाडण्याचा प्रयत्न केला, तरी मी उठेन. मी सकाळी उठते आणि नमाज करते. कारण, तू मला इस्लाम धर्म स्वीकार करायला लावला आहेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

इतकेच नाही, तर राखीने खुलासा केला की, “ती ओशिवरा पोलिसांवर कशी नाराज आहे, जिथे तिने आदिलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ती म्हणाली, ‘मला वाईट वाटते त्यांनी माझे बँक स्टेटमेंट आणि माझ्याकडून घेतलेल्या पैशांची चौकशी केली नाही. त्याने काहीही केले नाही. शोधाशोध करूनही त्यांनी त्याचा फोन आणला नाही. त्याला मोकळे का सोडले आणि त्याच्या विरोधात कोर्टात पुरावे का सादर केले नाहीत. एका सेलिब्रिटीला तुम्ही न्याय देऊ शकला नाही, सामान्य माणूस तुमच्याकडून काय अपेक्षा करू शकतो? प्रत्येक माणसाला – मग तो खाकी असो वा खादी – येथे त्रास सहन करावा लागतो.”

राखी पुढे म्हणाली, “देव माझ्यासाठी पुरावा घेऊन येईल. माझ्याकडे आमचे व्हिडिओ, घाणेरडे व्हिडिओ, माझे आणि इतर मुलींचे घाणेरडे व्हिडिओ आहेत. देवावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सगळे एका बाजूला आणि माझा देव एका बाजूला. त्याचा फोन सापडावा म्हणून मी प्रार्थना करत आहे. पण मला माहित आहे की, पोलिस ते शोधू शकणार नाहीत. मात्र, मला म्हैसूर पोलिसांवर पुर्ण विश्वास आहे, जे मला मदत करू शकतात. आदिलवर विश्वास ठेवू नका. त्याचा फोन शोधा, नाहीतर आमचे व्हिडिओ व्हायरल हाेणार. त्याने हे व्हिडीओ कसे बनवले आणि पैशासाठी कसे विकले हे बघायला तुम्हाला आवडेल का? त्याने बायकोला सोडले नाही, तर तो इतर मुलींना काय सोडणार.”

शेवटी, राखीने आदिलचा बदला घेण्याची शपथ घेतली आणि जगभरात डान्स अकादमी उघडण्याचे वचन दिले.(tv actress rakhi sawant raging on mumbai police says cannot bring justice to celebrities watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनेक अभिनेत्रींसाेबत जाेडले गेले नाव, पण शेवटी राहिला अविवाहित, ओळखा पाहू काेण?

धक्कादायक! समंथा रुथ प्रभूचा शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेत्री गंभीररित्या जखमी

हे देखील वाचा