Tuesday, June 25, 2024

राखी सावंत तिसऱ्यांदा अडकणार ‘या’ कलाकारासाेबत लग्न बंधनात?, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या लग्नाचे फाेटाे व्हायरल झाल्यापासून राखीने आदिल दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण आता इतके वाढले आहे की, आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रामा क्वीनचा नवरा तुरुंगात आहे, तर राखी कामावर परतली आहे. दरम्यान, आता राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

राखी सावंत (rakhi sawant) हिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ड्रामा क्वीनला नववधूच्या वेषात पाहून सोशल मीडिया युजर्सचे डोळे पाणावले आहेत. राखी पुन्हा लग्न करणार का?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशात पॅपराझींने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये खुद्द राखीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसते की, “मी एकदाच लग्न केले आहे, त्यामुळे मी पुन्हा कधीच लग्न करणार नाही. मला आयुष्यात पुन्हा लग्नाचा पोशाख घालायचा नाही. आता थेट कबरीत जाणार, लग्न करणार नाही.” आदिलबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझा एकच वर आहे, तो तुरुंगात आहे.”

राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शूटिंग लोकेशनवर तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये प्रवेश करताना तिच्या पतीबद्दल बोलत आहे. आदिलबद्दल बोलताना ड्रामा क्वीन म्हणाली, “वधू आली आहे, वर तुरुंगात आहे. आज रडू नकोस, फक्त आनंदी राहा. मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मंडळी आम्ही तुम्हाला सांगताे की, राखी सावंतने आदिलवर मारहाण आणि पैसे चोरल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आदिलचे इतर मुलींसोबतही संबंध असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.(tv actress rakhi sawant adil khan durrani drama queen bridal outfit video viral talks about husband in front of camera)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल, पत्नी प्रियाबद्दलच्या ‘या’ प्रश्नाला उत्तर देताना गोंधळे विनोदवीर

‘आख़िर क्यूँ पल में…’, माधवी निमकरचा ‘ताे’ व्हिडिओ पाहिलात का?

हे देखील वाचा