Sunday, June 22, 2025
Home अन्य रिद्धी डोगराला आवडत नाहीत आयटम नंबर? म्हणाली, ‘माझे अंगप्रदर्शन…’

रिद्धी डोगराला आवडत नाहीत आयटम नंबर? म्हणाली, ‘माझे अंगप्रदर्शन…’

टीव्ही जगतात विशेष ठसा उमटवल्यानंतर रिद्धी डाेगरा आता ओटीटीवरही प्रसिद्ध झाली आहे. लवकरच ती ‘लकड़बग्घा’ चित्रपटात दिसणार आहे. इंडस्ट्रीत दहा वर्षे घालवलेल्या रिद्धीचा असा विश्वास आहे की, ती केवळ पुढे जाण्यासाठी कोणतेही पात्र साकारु शकत नाही. तिला फक्त अशाच भूमिका करायला आवडतात, ज्याचा काही प्रभाव पडतो. अलीकडेच, रिद्धीने माध्यमांशी संवाद साधताना तिच्या करिअरबद्दल आणि  निवडीबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. काय म्हणाली रिध्दी? चला जाणून घेऊया…

रिद्धी डोगरा (ridhi dogra) हिचे म्हणणे आहे की, “ऍक्टरची एक लाइन असते. जी त्याला ओलांडायची नसते. मला अशी भूमिका कधीच करायची नाही, ज्यामध्ये स्त्रिया एखाद्या वस्तूसारखे दिसतात. मी आय कँडी म्हणून जगू शकत नाही. माझी व्यावसायिक वाढ माझ्या तत्त्वांच्या आड कधीच आली नाही.”

रिद्धी पुढे म्हणाली, “मी माझे शरीर विनाकारण दाखवण्याच्या विरोधात आहे. स्क्रिप्ट किंवा कथेची जाेपर्यंत मागणी नाही ताेपर्यंत मी माझे अंगप्रदर्शन करत नाही.” रिद्धीला आयटम नंबरही आवडत नाहीत. ती म्हणते, “मला कोणतेही कारण नसताना लहान कपड्यांमध्ये आयटम सॉन्ग किंवा म्युझिक व्हिडीओ करायचे नाहीत. कारण तिथे मी माणूस म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून आहे. जर मी तसे केले तर मला ते पाखंड वाटेल. महिलांकडे पाहणारे लोक मला सहन होत नाहीत. महिलांना वस्तू म्हणून वागवले जाणे मी सहन करू शकत नाही. मी असा म्यूझिक व्हिडिओ करू शकत नाही जिथे 20 दशलक्ष लोक माझ्या शरीराकडे अश्लिल नजरेने पाहत असतील.”

रिद्धी पुढे म्हणाली की, “अशा भूमिका करणाऱ्यांना मी जज करत नाही. अशी पात्रं करण्यामागे त्यांची स्वतःची कारणं असू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की, सगळ्यांनीच केलं तर मीही करावं. काहींना नाचायला, वेषभूषा करायला आवडते. मला सुद्धा आवडते, पण मला आयटम साँग आवडत नाहीत. कारण, त्यात स्त्रिया वस्तू म्हणून दाखवल्या जातात.” असे मत रिध्दीने मांडले आहे.(tv actress ridhi dogra says she cant play glamour prop and give people chance to ogle at her)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्याचे भोजपुरी रॅप व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल

आराध्याचा हात धरून चालल्याने ऐश्वर्या पुन्हा झाली ट्राेल; युजर्स म्हणाले, ‘लेकीच्या पायात फाॅल्ट…’

हे देखील वाचा