Thursday, March 28, 2024

‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्याचे भोजपुरी रॅप व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल

आजच्या सोशल मीडियाच्या काळात काय, कधी, केव्हा, कसे व्हायरल होईल आणि कोण लगेच सेलेब्रिटी होईल हे खुद्द देवाला देखील सांगता येणार नाही. सोशल मीडियामुळे अनेक सामान्य लोकं सेलेब्रिटी झाले असल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मध्यंतरी एका पाकिस्तानी मुलीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला ज्यात ती ‘मेरा दिल यह पुकारे’ गाण्यावर डान्स करताना दिसली. हिरव्या रंगाच्या अतिशय सैल ड्रेसमध्ये डान्स करणारी पाकिस्तानी मुलगी एका रात्रीत ट्रेंडिंगमध्ये आली. अशातच आता या गाण्याचे भोजपुरी रॅप व्हर्जन देखील प्रदर्शित करण्यात आले आहे.

भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांच्या चाहत्यांसाठी ही एक नक्कीच चांगली बातमी असेल. ‘मेरा दिल यह पुकारे’ या गाण्यासोबत भोजपुरी धून आणि भोजपुरी रॅप असे हटके कॉम्बिनेशन पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. अशा या हटके गाण्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याचे हे भोजपुरी व्हर्जन फेसबुकवरील लोकप्रिय चॅनेल बिहारी नंबर वनवर प्रदर्शित केले गेले आहे. या गाण्याला आतापर्यंत 132K एवढ्यावेळा पहिले गेले असून असंख्य लोकांच्या त्यावर कमेंट्स येत आहे. गाण्याला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले गेले , “या नवीन वर्षात भोजपुरी रॅपचा आनंद घ्या.”

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पठडीबाहेरील भोजपुरी गाणी अशी व्हायरल झाली आहे. याआधी देखील अनेक भोजपुरी गाणी ही सोशल मीडियावर तुफान गाजली. या गाण्यांमुळे देखील अनेक कलाकार पुढे आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ शोमधून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट

शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा झटका, सिनेमागृहात ‘पठाण’ रिलीज होणारच नाही?

हे देखील वाचा