टीव्ही शो ‘कसाेटी जिंदगी की’मध्ये प्रेरणा म्हणून वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी आता 42 वर्षांची झाली आहे. पण तिची शैली, तिची स्टाईल आणि तिचा फिटनेस कोणालाही आश्चर्यचकित करण्यास पुरेसा आहे. अलीकडेच दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान स्टारर यांच्या ‘पठाण‘ या चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणे चर्चेत आले होते. अशातच आता या गाण्यावर श्वेता तिवारी देखील तिच्याच स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.
श्वेता तिवारी (shweta tiwari) हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाथरोब घालून ‘बेशरम रंग’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अनेक अभिनेत्री या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवत असताना श्वेताने या गाण्यावर ट्रांझिशन रील बनवली आहे. श्वेता बाथरोब परिधान करुन डान्स करत आहे, परंतु ती बाथरूममध्ये जेव्हा जाते, तेव्हा पुढच्याच क्षणी ती अतिशय स्टायलिश पिवळ्या रंगाच्या पँट-सूटमध्ये बाहेर पडताना दिसते.
View this post on Instagram
श्वेताने तिच्या या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा ते मला 1000 वेळा विचारतात की, तयार होण्यासाठी किती वेळ लागेल, तेव्हा मी अशा प्रकारे तयार होते.” श्वेता तिवारीची ही अनोखी शैली तुम्ही देखील पाहू शकता.
श्वेता सध्या झी टीव्हीवरील शो ‘अपराजिता’मध्ये दिसत आहे. श्वेताचा हा शो प्रेक्षकांना खूप पसंतीस उतरला आहे. दुसरीकडे, श्वेताची मुलगी पलकही सध्या तिच्या कामात व्यस्त आहे. ती सलमान खानला त्याच्या आगामी चित्रपटात असिस्ट करत आहे. ‘बेशरम रंग’बद्दल बाेलायचे झाले, तर हे गाणे ‘पठाण’ चित्रपटातील आहे, जे दीपिका पदुकोणने ‘भगव्या रंगाची बिकिनी’ परिधान केल्यामुळे चर्चेत आले होते. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.(tv actre`s`s shweta tiwari dance on deepika padukone pathan song besharam rang in bathrobe video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पतली कमरिया…’म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी साडीमध्ये लगावले जोरदार ठुमके, व्हिडिओ झाला व्हायरल
ब्रेकिंग! बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकाराचे हृदय विकाराच्या आजाराने निधन