Wednesday, June 26, 2024

शॉर्ट स्कर्ट अन् बिकिनी टॉपमध्ये श्वेता तिवारीने घातला धुमाकूळ, ‘या’ काराणास्तव युजर्सचे वाढले टेंशन

‘कसौटी जिंदगी की‘ फेम श्वेता तिवारी हिला आज काेत्याही ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्वेता तिवारीने बॉलिवूडपासून भोजपुरीपर्यंतच्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे. अभिनयासोबतच श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना चकित करते. दरम्यान, तिचे लेटेस्ट फाेटाे चांगलेच चर्चेत आहेत.

श्वेता तिवारी (shweta tiwari) हिने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिचा लेडी बॉस लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, श्वेताने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट टॉप, काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि कोट देखील घातला आहे, जाे तिच्या साैंदर्यात आणखीनच भर घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता तिवारीच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. इतकेच नव्हे तर, चाहते सातत्याने कमेंट करून अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. केवळ चाहतेच नाही, तर स्टार्सही श्वेताच्या फोटोंना खूप पसंती देत ​​आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘मॅडम तुम्ही.. या वयात खूप हॉट आहात… तुम्ही नवीन येणाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून घेत आहात… या वयात तुम्ही तुमच्या मुलीशी स्पर्धा करत आहात.’, तर एकाने लिहिले, ‘पलक तिवारीची धाकटी बहीण.’ अशात एकाने कमेंट करत लिहिलं, ‘हे टेंशनवाली गोष्ट आहे…. पलकचं नातं कसं असेल… तुम्ही कधी विचार केला आहे का? की, मुलीपेक्षा आईने कहर केला आहे.’ श्वेताच्या या फोटोंवर अशा अनेक कमेंट येत आहेत.(tv actress shweta tiwari latest bold photoshoot in mini skirt and bikini top pics goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानसह ‘हे’ प्रसिद्ध कलाकार कोलकात्यातील कॉन्सर्टमध्ये ठाेकणार धूम, ‘इतक्या’ लाखात मिळणार तिकिट

रणवीरने भर मुलाखतीत दीपिकाला केले किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा