Monday, April 15, 2024

‘कसौटी जिंदगी की’ फेम एरिका फर्नांडिसने व्यक्त केली तिची व्यथा; म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये टीव्ही अभिनेत्रींसोबत…’

एरिका फर्नांडिस हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक अप्रतिम शो केले आहेत, ज्यामध्ये ‘रंग प्यार के ऐसे भी‘ आणि ‘कसौटी जिंदगी‘ की या सारख्या शोचा समावेश आहे. तिने आपल्या भूमिकांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. जिथे टेलिव्हिजनमधून यश मिळवल्यानंतर एक आणि अनेक कलाकार चित्रपटांमध्ये येतात. तिथे एरिका फर्नांडिस हिला यासाठी माेठा संघर्ष करावा लागत आहे.

एरिका फर्नांडिस (erica fernandes) अनेक नवीन ठिकाणी प्रयत्न करताना असताना सध्या अभिनेत्री शॉर्ट फिल्म्सद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. ती लवकरच ‘द हॉंटिंग’मध्ये दिसणार आहे, जी 21 एप्रिलपासून अॅमेझाॅन मिनीवर प्रसारित हाेईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erica J Fernandes (@iam_ejf)

अशातच एरिकाला तिच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल विचारले असता, ती म्हणाली, “बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला एखाद्या ग्रुपचा भाग असणे किंवा कनेक्शन असणे आवश्यक आहे. हे सत्य आहे. टीव्ही कलाकारांना तुच्छतेने पाहिले जाते. आमच्यात भेदभाव केला जातो. बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांना दोन नजरेने पाहिले जाते. माझ्यासोबतही असे झाले. तुम्ही काेणत्याही टीव्ही कलाकार विचारा तुम्हाला हेच उत्तर मिळेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Erica J Fernandes (@iam_ejf)

टीव्ही स्टार आणि चित्रपट स्टार यांच्यात काय फरक आहे, असे विचारले असता. यावर ती म्हणाले, “टीव्ही कलाकार दररोज प्रेक्षकांच्या घरी जात असल्याने त्यांचा प्रेक्षकांवर अधिक प्रभाव पडतो. दुसरीकडे, जर आपण चित्रपट कलाकारांबद्दल बोललो तर, जोपर्यंत लोक चित्रपट पाहत आहेत, तोपर्यंत त्यांच्याशी एक संबंध आहे. लोक थिएटरमधून बाहेर पडताच. ते त्याला विसरतात. यामुळे टीव्ही तुमच्यावर दीर्घकाळ छाप सोडण्यात यशस्वी होतो.” असे एरिकाचे मत आहे. (tv actress erica fernandes claims tv actor are discriminated in bollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“हात तर जोडलेच आहे आता काय…”,म्हणत अमिताभ बच्चन यांचे ‘या’ महत्वाच्या व्यक्तीला गाऱ्हाणे

सोनम कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केले साडीतील फाेटाे; म्हणाली, ‘हे घालणे सर्वात…’

हे देखील वाचा