Wednesday, June 26, 2024

स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट

अभिनेत्रीतून राजकारणी बनलेल्या स्मृती इराणी आजही त्यांच्या डेब्यू सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी‘ साठी स्मरणात आहेत. आदर्श सून तुलसी विराणी बनून स्मृती इराणींनी घराघरात आपला ठसा उमटवला होता. अशात आता त्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर असला तरी साेशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. अशात अलीकडेच त्यांनी त्यांच्या लग्नाशी संबंधित असा सल्ला दिला आहे, जो ऐकल्यानंतर चाहत्याना हसण अनावर झाले आहे.

स्मृती इराणी (smriti irani) या अधूनमधून सोशल मीडियावर काही मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. कधी मजेदार कॅप्शनसह सेल्फी शेअर करून, तर कधी काही व्हिडिओ शेअर करून, स्मृती इराणी आपल्या विनोदबुद्धीने सर्वांचे मनाेरंजन करतात. यावेळीही त्यानी असेच काहीसे केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

खरे तर, स्मृती इराणी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दयाबेन आणि जेठालाल यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेठालाल दयाबेनला म्हणतो, “जेव्हा देव बुद्धी वाटप करत होता तेव्हा तू कुठे होतीस.” यावर दया म्हणते, “मी तुझ्यासोबत लग्नाच्या फेऱ्या घेत होती.” यासोबतच आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जेठालालने दाखवले आहे की. लाडू खाल्ल्यानंतर ताे कशाप्रकारे दयाबेनच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकताे. यासाेबतच त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्टाेरीतून हा धडा मिळताे की, ज्यांनी फेऱ्या मारल्या आहेत त्यांनी बदाम खावेत.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 15 वर्षांपासून टेलिव्हिजन जगतात राज्य करत आहे. यादरम्यान अनेक कलाकारांनी या शोला अलविदा केला, पण चाहत्यांची मालिकेची क्रेझ संपली नाही.(tv actress smriti irani gave marriage advice in hilarious manner sharing video from tmkoc )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करियरच्या टॉपवर घेतलेले लग्नाचा निर्णय आणि अमेरिकेतील जीवनशैली, अश्विनी भावे यांनी सांगितला त्यांचा हा प्रवास

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृतीमुळे अभिनेते मेहमूद झाले होते आपल्याच मानसपुत्रावर नाराज, स्वतःच केला होता खुलासा

हे देखील वाचा