सध्या चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार त्यांना झालेल्या फसवणुकीचे उलघडे करताना दिसत आहेत. आता आणखी एका अभिनेत्रीने तिचे पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. ‘देवों के देव महादेव’मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री सोनारिका भदोरिया(Sonarika Bhadoria) हिने आता एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने तिच्या एका कार्यक्रमावर अद्याप पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. सोनारिकाने ‘दास्तान-ए-मोहब्बत’ या मालिकेत काम केले होते. तो काळ तिच्या कारकिर्दीचा सर्वात वाईट काळ मानतो. या शोसाठी काम करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले. या गोष्टीला ३ वर्षे झाली. सोनारिकाशिवाय इतरही कलाकार आहेत ज्यांचे पैसे थकले आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी की, कलर्सवर प्रसारित होणाऱ्या ‘दास्तान-ए-मोहब्बत’ या शोमध्ये शाहीर शेख आणि सोनारिका भदोरिया मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्रीने सांगितले की, या शोमध्ये काम करून ३ वर्षे झाली आहेत पण त्यासाठी पैसे मिळाले नाहीत. या शोसाठी सोनारिकाला एकूण ७० लाख रुपये मिळणार होते. याशिवाय इतर कामगार आणि कलाकार आहेत ज्यांची फी कार्यक्रमाने भरलेली नाही. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडून सर्व कागदपत्रे पूर्ण झाली आहेत. तिने कोरोनापूर्वी या कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण केले होते, परंतु अद्याप ही मालिका रिलीझ झालेली नाही.
सध्या सोनारिका एका वेब सीरिजवर काम करत आहे आणि लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. तिने ‘देवों के देव महादेव’ या टीव्ही शोमध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती. याशिवाय ती इतिहास रहस्य या टीव्ही कार्यक्रमाचा भागही राहिली आहे. सोनारिका भदोरियाने २०१५ मध्ये ‘जादूगाडू’ या तेलगू चित्रपटात पार्वती नावाच्या महिलेची भूमिका साकारली होती. याशिवाय ती तमिळ चित्रपटातही झळकली होती. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती २०१६ मध्ये ‘सनसैन’ या चित्रपटात दिसली होती. हा एक हॉरर चित्रपट होता. त्यानंतर ती ‘इश्क में मरजावा’ या टीव्ही कार्यक्रमाचा ही समावेश आहे.
हेही वाचा –