हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. या अभिनेत्रींच्या मालिकेतील सोज्वळ, सुंदर भूमिका असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या अभिनेत्री बोल्डनेस आणि त्यांच्या बिंधास्त लूकसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यामध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री सृष्टी रोडेचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. सृष्टी रोडेच्या (Srishty Rode) बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अलिकडेच तिच्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सृष्टी रोडेचे नाव पहिल्यांदात घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सध्या अभिनेत्री सृष्टी रोडे थायलंडमध्ये सुट्टीची मजा घेताना दिसत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सृष्टीने मोनोकिनी घालून बोल्ड लूक दाखवला आहे.
View this post on Instagram
सध्या अभिनेत्री थायलंडच्या फुकेतमध्ये आहे आणि तिथून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. नुकताच तिने ब्लॅक मोनोकिनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ केवळ सामान्य युजरच नव्हेतर अनेक सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमधील सृष्टीच्या लूकवर तिचे चाहते खूपच फिदा झाले आहेत.
सृष्टी रोडेच्या करिअरबद्दल सांगायचे तर तिने 2007 मध्ये ‘कुछ ऐसा’ या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. या शोमध्ये तो अल्पावधीतच दिसला होती. यानंतर ती ‘बैरी पिया’, ‘ये इश्क ही’, ‘छोटी बहू’, ‘पुर्नविवाह’ आणि ‘इश्कबाज’ सारख्या अनेक शोमध्ये दिसली आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस 12’ या रिअलिटी शोचाही भाग राहिली आहे.