Thursday, April 18, 2024

शस्त्र परवान्यानंतर भाईजानने खरेदी केली बूलेटप्रूफ कार, किंमत ऐकूण व्हाल हैराण

अभिनेता सलमान खानला (Salman Khan)  आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीने त्याचे कुटूंबीय आणि स्वतः सलमान खान चांगलाच हादरुन गेलेला दिसत आहे. या धमकीनंतर अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर तात्काळ निर्णय देत सलमान खानला शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता सुरक्षिततेची खबरदारी म्हणून नवीन महागडी बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ. 

सलमान खान हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि डॅशिंग भूमिकांसाठी तो सिनेजगतात विशेष प्रसिद्ध आहे. आपल्या चित्रपटांइतकाच सलमान खान त्याच्या रागीट स्वभावासाठीही सिनेजगतात लोकप्रिय आहे. काळवीट शिकार प्रकरण तसेच हिट अँन्ड रण केसमुळे त्याला अनेकदा कोर्टाचीही पायरी चढावी लागली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला होता. या गॅंगने सलमान खानलाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या नव्या कारमधून विमानतळावर उतरताना दिसत आहे. शस्त्र परवाना मिळाल्यानंतर सलमान खानने ही गाडी खरेदी केली आहे. टोयोटाची लँन्ड क्रूजर असे या गाडीचे नाव असून त्याची किंंमत जवळपास १.५ कोटी इतकी आहे. सलमान खानने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत जास्त असल्याचे कारण म्हणजे गाडीपूर्णपणे बुलेट प्रूफ असून त्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

दरम्यान सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘टायगर जिंदा है ३’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर ‘बिग बॉस १६’ मधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा –

बाबो! रणवीर सिंग झालाय समंथावर फिदा; म्हणतोय, ‘तिच्यासोबत भविष्यात…’

सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने भडकले नेटकरी, धार्मिक भावना दुखावल्याचे केला आरोप

‘तारक मेहता’ मालिकेचे ग्रहण काही सुटेना! आता ‘हा’ कलाकार ठोकणार कार्यक्रमाला रामराम

हे देखील वाचा