Saturday, October 18, 2025
Home व्हिडीओ सुंबुलने केली फहमनसोबत होळी साजरी; एकमेकांवर उधळला गुलाल, पाहा व्हिडिओ

सुंबुलने केली फहमनसोबत होळी साजरी; एकमेकांवर उधळला गुलाल, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्स आज म्हणजेच मंगळवारी (दि. 7मार्च)ला हाेळीच्या रंगात रंगताना दिसले. देशभरात होळी 8 मार्चला असली तरी मुंबईत हाेळी 7 मार्चला साजरी केली जात आहे. यानिमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीत होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक स्टार्स पोहोचले. त्यापैकी एक होती सुंबुल तौकीर खान.

सुंबुल तौकीर खान (sumbul touqeer khan) आणि फहमन खान (fahman khan) मुंबईत झालेल्या होळी पार्टीत एकत्र दिसले. यादरम्यान दोघांनीही अशा प्रकारे होळी खेळली की, सगळे बघतच राहिले. या व्हिडिओमध्ये फहमान प्लेटमध्ये रंग आणि गुलाल घेऊन उभा असताे. मात्र, त्याल जशी सुंबुल दिसते तसा ताे सर्व रंग आणि गुलाल तिच्या अंगावर ओतताे, ज्यानंतर सुंबुलही कोणतीही कसर सोडत नाही अन् फहमदच्या अंगावर गुलाल टकते. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सुंबुलचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ‘किसी डिस्को में जाये’ या प्रसिद्ध गाण्यावर राजीव आणि प्रियांका चौधरीसोबत स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. डान्स दरम्यान, राजीव इतका उत्तेजित होतो की, ताे सुंबुलला वर उचलून फिरवायाला लागताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या दरम्यान, प्रियांका चाहर चौधरी येते आणि डान्स करायला लागते. या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असून भन्नाट कमेंट करत आहेत. त्याचसाेबत चाहते सुंबुलच्या डान्सचेही कौतुक करत आहेत. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सुंबुलच्या डान्ससमोर सगळे फेल आहेत.’

सुंबुल शेवटीच ‘बिग बाॅस16’मध्ये दिसली हाेती, ज्यातून तिला खूप लाेकप्रियता मिळाली.(tv actress sumbul touqeer khan played holi with fahman khan watch video )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्काला आठवले बालपणीचे जुने दिवस; व्हिडिओ शेअर करत म्हणाली,’इथेच मी पोहायला…’

सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’

हे देखील वाचा