Monday, June 24, 2024

बिग बॉस १६ फेम अभिनेत्री सुंबुल तौकीर खानने विकत घेतले स्वप्नातील घर व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री सुंबुल तौकीर खानला बिग बॉस १६ नंतर मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये येण्याआधी देखील तिला मालिकांमुळे बऱ्यापैकी ग्लॅमर प्राप्त झाले होते, मात्र शोनंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये मोठी वाढ झाली. खूप कमी वयात सुंबुलने मोठे यश मिळवले आहे. बिग बॉसच्या घरात देखील जास्त दिवस राहणारी सर्वात तरुण स्पर्धक म्हणून तिने रेकॉर्ड देखील बनवला. फिनालेच्या काही काळ आधीच तिला घरातून बाहेर पडावे लागले. मात्र आता सुंबुल विविध बिग बॉसच्या पार्ट्यांमध्ये दिसत असते. सोबतच विविध फोटोशूट देखील ती करत असते. घरातून बाहेर आल्यानंतर सुंबुलने मोठी झेप घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

सुंबुल तौकीर खानने नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, तिने एक घर विकत घेतले आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, “मित्रानो माझे नवीन घर तयार होत आहे. सध्या अजून काम चालू आहे. माझे नवीन घर मी लवकरच तुम्हाला दाखवेल. यासोबतच तिने तिची आर्किटेक्टची देखील सर्वाना ओळख करून दिली. आणि म्हणाली, “तुमच्या मनात काही असेल, सल्ला द्यायचा असेल तर सांगा आम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न करू.” तिच्या या व्हिडिओवर फॅन्सने कमेंट्स करत अभिनंदन केले असून, तिला विविध सल्ले देखील दिले आहेत.

तत्पूर्वी सुंबुल प्रसिद्ध टीव्ही शो असलेल्या इमलीमधून लोकप्रिय झाली. या शोमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली. शोमध्ये तिची भूमिका संपल्यानंतर तिने बिग बॉस १६ मध्ये सहभाग घेतला होता. आता बिग बॉस संपल्यानंतर सुंबुल कुठे दिसते याची वाट सर्वच बघत आहे. मात्र अजून कोणतीच माहिती तिच्या आगामी कामाबद्दल मिळाली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

 

हे देखील वाचा