मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हल्ली कमालीच्या सक्रिय असल्याच्या दिसतात. त्या दरदिवशी आपल्या आयुष्यातील नवनवीन गोष्टी शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. यादरम्यान जर त्यांचा विचित्र फोटो पाहायला मिळाला, तर चाहतेही हैराण होतात. असेच काहीसे आता आणखी एका अभिनेत्रीबाबत पाहायला मिळाले आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टीना दत्ता मागील काही दिवसांपासून सातत्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना दिसत आहे. नुकतेच तिने आपला असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहतेही चिंतेत पडले आहेत. विशेष म्हणजे, तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत ती, मच्छी मार्केटमध्ये मासे विकताना दिसत आहे. (TV Actress Tina Datta Is Selling Fish And Vegetables In Her Latest Photos)
या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला असून ती एकदम सामान्य मुलीप्रमाणे दिसत आहे. नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करणारी टीना यावेळी मासे विकताना दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते नक्कीच गोंधळात पडले आहेत.
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे काय सुरू आहे याचा कुणी अंदाज लावेल का?”
टीनाच्या या फोटोला २० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत. यापूर्वी टीनाने भाजी विकतानाचेही फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोलाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते.
टीनाच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने ‘परिणीता’ मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, तिला खरी ओळख ‘उतरण’ या मालिकेतून मिळाली. यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस का नया दौर’, ‘कॉमेडी क्लासेस’, ‘कर्मपाल दाता शनी’, ‘डायन’, ‘नक्षलबारी’ यांसारख्या शोमध्येही काम केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…