Friday, June 13, 2025
Home टेलिव्हिजन तुनिषा शर्माच्या आईने केला मालमत्तेचा खुलासा; म्हणाली, ‘भाड्याच्या घरात राहते…’

तुनिषा शर्माच्या आईने केला मालमत्तेचा खुलासा; म्हणाली, ‘भाड्याच्या घरात राहते…’

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 10 दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी तिच्या ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या शोच्या सेटवर आत्महत्या केली होती. आज म्हणजेच बुधवारी(दि. 4 जानेवारी)ला या अभिनेत्रीचा 21 वा वाढदिवस आहे. मात्र, आता ती या जगात नाही. तिच्या मृत्यूनंतर तिची आई वनिता शर्माने अभिनेत्रीचा एक्स बाॅयफ्रेंड आणि सहअभिनेता शीझान खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने आपल्या मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा वनिता यांचा आरोप आहे. गेल्या 10 दिवसांत या प्रकरणात अनेक प्रकारचे खुलासे होताना दिसले. तर, मुलीच्या वाढदिवसानिमित्त वनिता शर्मा यांनी आपल्या मुलीची आठवण करून मीडियाशी संवाद साधला.

वनिता शर्मा यांनी सांगितले की, “त्यांची मुलगी तुनिषा शर्मा हिने कोणतीही मालमत्ता सोडलेली नाही.” त्या म्हणाल्या, “तिला खरेदी करायला आवडत नाही, पण तिला एक्सपेंसिव प्रॉडक्ट्स आवडतात. तिच्या 18व्या वाढदिवसाला मी तिला हिऱ्याची अंगठी करून दिली.” त्यानंतर आपला मुद्दा पुढे करत त्या म्हणाल्या, “आम्ही माय-लेकी पुढच्या वर्षी घर खरेदी करण्याचा विचार करत होतो. याशिवाय तुनिषाची कार आणि लॅपटॉप, सर्व काही एमआय वर आहे.”

त्याचवेळी वनिता यांनी मुलीच्या वाढदिवसासंदर्भात काही खुलासेही केले. त्यांनी सांगितले की, “त्या मुंबई सोडून जाईल कारण, त्या या शहरात फक्त त्यांच्या मुलीसाठी हाेत्या.” पुढे वनिता म्हणाल्या की, “मला माझ्या मुलीला तिच्या 21 व्या वाढदिवशी सरप्राइज द्यायचे हाेते. ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनची कोणतीही योजना नसली तरी, त्यांना तुनिषासाठी एक थीमचा केक आणायचा होता आणि तिच्या जवळच्या मित्रांना आमंत्रित करायचे होते. आज माझी मुलगी माझ्यासोबत नसली तरी तिच्या स्मरणार्थ केक कापला जाईल.”

तुनिषाने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. महाराणा प्रताप या मालिकेद्वारे तिने टीव्हीवर पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत ती अनेक लोकप्रिय शोचा भाग हाेती. (tv actress tunisha sharma mother made a big disclosure about the property worth crores lives in a rented house)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फीच्या अशा वागण्याला समर्थन आहे का?’, म्हणत महिला आयोगावर भडकल्या चित्रा वाघ

पठाण सिनेमातील ‘झूमे जो पठान’ या गाण्याचे ‘हे’ मजेशीर व्हर्जन पाहून व्हाल हसून हसून बेजार

हे देखील वाचा