Thursday, November 30, 2023

तुनिषा शर्माच्या आईने केले गंभीर आरोप, ‘शीजानचे कुटुंबिय तुनिषावर धर्मांतराचा दबाव…’

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने अवघ्या 20व्या वर्षातच (दि, 24 डिसेंबर) रोजी शुटिंगच्या सेटवर आत्माहत्या केली होती. या प्रकरणामध्ये सतत नवीन खुलासे होत आहेत. आता हे प्रकरण वेगळच वळण घेताना दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींसोबतटच राजकारणी देखिल या प्रकरणामध्ये बोलताना दिसून आले आहेत. तुनिषाचा बॉयफ्रेंड शीजान खान याच्यासोबत प्रेमामध्ये नैराश्य आल्याने तिने हे टोकाचं पाउल उलचून स्वत:चं आयुष्य संपवलं असा आरोप तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी केला होता. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत शीजान आणि त्याच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत.

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्महत्येनंतर अनेक नवीन खुलासे होत आहेत. नुकतंच अभिनेत्रीची आई म्हणजेच वनिता शर्मा (Vanita Sharma) यांनी नुकतंच एका पत्रकार परिषदेत तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप शीजनच्या कुटुंबियावंरही केला आहे. वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “शीजान आणि त्याचे कुटुंबिय तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होते. तिला बुरखा घलण्यसाठीही तिच्या कुटुंबियांनीच सांगितले होते. त्याशिवया शीजानची बहिण फलक नाझ (Falaq Naaz) हिने तुनिषाला बळजबरीने टॅटू काढायला लावला होता.

वनिता शर्मा यांनी पुढे सांगितले की, “तुनिषा शीजानपेक्षा 10 वर्षीनी लाहान असून ती खूप भावनिक होती. तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने दुसऱ्या मुलीशी का संबंध ठेवले? तुनिषाने 25 हजार रुपयाचे गिफ्ट शीजनला दिले होते. तुनिषाने आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदरच मी शीजानाल भेटण्यासाठी सेटवर गेले होते. त्यावेळी तो म्हणाला की, सॉरी आता काही होऊशकत नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा.”

‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेमध्ये दोघेही मुख्य भूमिका साकारत होते. मालिकेच्या सेटवर दोघांची प्रेमकथा सुरु झाली आणि तुनिषाने तिच्या आयुष्याचा शेवटही त्याच शुटिंगच्या सेटवर केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
धक्कादक! रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, उर्वशी पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘केजीएफ 3’ मध्ये कॅमिओ करतोय का हार्दिक? सोशल मीडियावर पोस्ट होतेय तुफान व्हायरल

हे देखील वाचा