Monday, July 1, 2024

शीजानने जामिनासाठी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा, एफआयआर रद्द करण्याची केली विनंती

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शीजान खान गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. या प्रकरणात अभिनेता जामिनासाठी अनेकवेळा कोर्टात हजर झाला. मात्र, आतापर्यंत त्याला दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, शीजनने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामीन अर्जाव्यतिरिक्त अभिनेत्याच्या वतीने आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे.

याआधी 13 जानेवारीला शीजन (sheezan khan) याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. शीजनला जामीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलाने पुरेपुर प्रयत्न केले. यासाेबतच त्यांनी शीजानच्या बचावासाठी अनेक खळबळजनक दावेही केले. मात्र, कोर्टाने शीजनची याचिका फेटाळून लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

अशातच शीजनची बहीण फलक नाजची प्रकृती खालावल्यानंतर शीजनच्या आईने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. आपल्या व्यथा मांडत आपल्या कुटुंबीयांना कशाची शिक्षा दिली जात आहे, असा सवाल त्यांनी पोस्टमध्ये उपस्थित केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

महत्वाच म्हणजे, गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्मा (tunisha sharma) हिने ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही शोच्या सेटवर आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तुनिषाची आई वनिता शर्माने तिच्या मुलीच्या आत्म’हत्ये प्रकरणी को-स्टार शीजानवर गंभीर आरोप केले होते. शीजनने तुनिषाची फसवणूक केल्याचा दावा तिने केला होता. अभिनेत्रीच्या आईच्या आरोपांनंतर शीजानवर एफआयआर दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.(tv actress tunisha sharma suicide case sheezan khan filed bail petition in bombay high court)

हे देखील वाचा