Thursday, March 30, 2023

ट्रोलर बोलला आणि तिने खरंच करून दाखवलं, उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग याने अभिनेत्री उर्फी जावेद हिला ‘फॅशन आयकॉन’ म्हणल्यापासून ती जास्तच चर्चेत आली आहे. ती तिच्या फॅशनने चाहत्यांना धक्क्यावर धक्के देत आहे. उर्फी ही दरदिवशी नवनवे प्रयोग करताना दिसते. त्यामुळे चाहतेही तिच्या प्रत्येक स्टाईलवर फिदा होतात. मात्र, तिची स्टाईल काही जणांना आवडत नाही. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. या ट्रोलिंगला न जुमानता उर्फी पुन्हा नव्या ढंगात चाहत्यांपुढे येते. आताही असेच काहीसे झाले आहे. उर्फीचा नवीन लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

काय आहे उर्फीची पोस्ट?
अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत उर्फी आधी साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि तिच्या पोस्टखाली एका कमेंटचा स्क्रीनशॉट दिसत आहे. त्यावर लिहिले आहे की, “हिला दगडांनी मारले पाहिजे.” त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये दिसते की, उर्फीने लहान-लहान चमकणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या दगडांनी बनलेला ड्रेस परिधान केला आहे. उर्फी या अंदाजात खूपच स्टायलिश दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या पोस्टचे कॅप्शन
उर्फीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “होय, या कमेंटने मला असे करण्यासाठी प्रेरित केले, माझ्यावर आरोप लावू नका, या कमेंटवर आरोप लावा.” उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, तिने पुन्हा एकदा वाहवा लुटली आहे. तिच्या या पोस्टवर कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत.

फॅशन इंस्टा आहे उर्फी जावेद
उर्फी जावेदने खूप कमी काळात अफाट लोकप्रियता मिळवली आहे. ती तिच्या फॅशन सेन्समुळे माध्यमांमध्ये झळकत असते. कधीकधी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. उर्फीच्या इंस्टाग्राम अकाऊंटबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत २११४ पोस्ट केल्या आहेत. तिला इंस्टाग्रामवर तब्बल ३४ लाख चाहते फॉलो करतात. तसेच, उर्फी ३७३ लोकांना फॉलो करते.

उर्फी हिला तिच्या चाहत्यांचे लक्ष कसे वेधायचे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
जरा इकडं पाहा! प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय, ‘सेक्ससाठी पुरुषांची गरज नाही’, सर्वत्र रंगलीय चर्चा
पन्नाशी पार केलेल्या अरबाजची ३० वर्षीय गर्लफ्रेंड आहे खूपच बोल्ड, व्हिडिओचा इंटरनेटवर नुसता धुमाकूळ
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशीच दिली चाहत्यांना गुड न्यूज

हे देखील वाचा