उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध आता महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. खरे तर नुकतेच चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधत महाराष्ट्रात असा नंगा नाच चालणार नाही असे म्हटले होते. या विधानावर उर्फीनेही प्रत्युत्तर देत माझा नंगा नाच सुरूच राहणार असे सांगितले. यानंतर चित्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य महिला आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते.
उर्फी जावेद (urfi javed) हिच्यावर कारवाई करण्यास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने का नकार दिला, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. चित्रा वाघ यांच्या म्हणण्यानुसार, “‘अनुराधा’ या वेब सीरिजच्या पोस्टरला अश्लील ठरवून महिला आयोग अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस बजावू शकते, तर उर्फीवर अशी कारवाई का नाही?” असा सवाल चित्रा यांंनी केला हाेता. यानंतर भाजप नेत्याच्या या वक्तव्यानंतर महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “अनुराध वेब सीरिजसाठी कोणत्याही अभिनेत्रीला नव्हे तर त्याच्या निर्मात्याला नोटीस बजावण्यात आली हाेती.” त्या म्हणाल्या की, “भाजप नेत्याच्या आरोपामुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे. नाेटीसवर चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत उत्तर न दिल्यास महिला आयोग त्यांच्यावर कारवाई करेल”, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
नोटीस जारी झाल्यानंतर आता चित्रा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याने म्हणाल्या की, “अशा 56 नोटिसा येत राहतात, आणखी एक नोटीस आली तर काय? विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे नंगा नाच करणार्याला नोटीस पाठवली जात नाही, आक्षेप घेणार्याला नोटीस पाठवली जात आहे.”
सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टीव्ही मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक टीव्ही शोचा भाग असलेल्या उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’ मधून ओळख मिळाली.(tv actress urfi javed controversy maharashtra women commission issues notice to bjp leader chitra wagh)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सर्वांच्या विरोधात जाऊन सुप्रियांनी ‘असा’ थाटला पंकज कपूरांशी संसार, शाहिदलाही देतात पोटच्या मुलाइतकं प्रेम
अनुष्कापासून ते बिपाशापर्यंत, ‘या’ अभिनेत्रींनी साकारल्यात हॉरर भूमिका, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा