Sunday, May 19, 2024

अनुष्कापासून ते बिपाशापर्यंत, ‘या’ अभिनेत्रींनी साकारल्यात हॉरर भूमिका, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

कॉमेडी, रोमांटिक, थ्रिलर या चित्रपटामध्ये काम करुन अनेक अभिनेत्रीने लोकप्रियता तर मिळवलीच आहे. पण आज आपण थरारक चित्रपटांविषयी बोलणार आहोत जे बघण्यासाठी प्रेक्षक मोठे धाडस घेउन येत असतात. या चित्रपटामध्ये आपल्या अवताराने आणि दमदार अभिनयाने लोकांना घाबरवून सोडतात. यामुळे अशा थरारक चित्रपटाचे सर्व श्रेय यामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना दिले जाते. आज आपण थरारक चित्रपटामध्ये जास्त काम करणाऱ्या अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडचे असे काही थरारक चित्रपट आहेत जे पाहिल्यानंतर प्रेक्षक जाम घाबरुन घामाघुम झाले होते. अशा थरारक चित्रपटामध्ये जास्त सुंदर असणाऱ्या अभिनेत्रीनेच भताच्या भूमिका केल्या आहेत. काही अभिनेत्रीने तर ‘डायन’ आणि ‘चेटकीन’च्या भूमिका एवढ्या चांगल्याप्रकारे निभावल्या आहेत की, प्रेक्षकांवर त्यांची भुरळ पाडली आहे. आज आपण अशाच पाच अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या भयानक भूमिकेने प्रेक्षकांना घाबरवून ठेवले आहेत.

अनुष्का शर्मा
सगळ्यात आधी अशा अभिनेत्रीविषयी माहिती घेऊ जिने एका चेटकीनीची भूमिका केली होती. अनुष्का शर्मा (Anushka Sharma)ने 2018 मध्ये ‘परी’ या चित्रपटामध्ये ‘चेटकीनी’ची भूमिका निभावली होती. तिच्या या अभिनयाचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन ‘क्लीन स्लेट फिल्म’ हाउसमध्ये केले होते. यापूर्वी अनुष्काने ‘फिल्लौरी’ या चित्रपटामध्ये चेटकीनची भूमिका केली होती.

ईशा कोप्पिकर
ईशा कोप्पिकर(Isha Koppikar) ही अभिनेत्री आज अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. तिने खूप वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘क्रिष्णा कॉटेज’ यामध्ये थरारक भूमिका निभावली होती. या चित्रपटामध्ये ईशासोबत सोहेल खान मुख्य भुमिकेत होता. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली होती आणि हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

मालिनी शर्मा
अभिनेत्री मालिनी शर्मा (Malini Sharma) ला आजही तिच्या चेटकीनच्या भुमिकेसाठी ओळखले जात आहे. तिने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘राज’ मध्ये चेटकीनची भमिका निभवली होती. या चित्रपटामध्ये मालिनीसोबत बिपाशा बासु(Bipasha Basu) आणि डीनो मोरिया (Dino Moria) हे मुख्य भुमिकेत होते आणि यासोबतच या चित्रपटामध्ये आशुतोष राणा यानेही महत्वाची भूमिका बजावली होती.

करिना कपूर
करीना कपूर (Kareena Kapoor) ने 2012 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तलाश’ या चित्रपटामध्ये डायनची भूमिका निभवली होती. या चित्रपटामध्ये आमिर खान (Amir khan) आणि राणि मुखर्जी (Rani Mukerji) हे मुख्य भुमिकेत होते. करीनाचा हा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

बिपाशा बासू
बिपाशा बासू(Bipasha Basu) ही एकमेव अभिनेत्री आहे जिने आतापर्यत बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त थरारक चित्रपटामध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट आजही चाहते आवर्जून पाहात आहेत. मात्र 2015 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अलोन’ या चित्रपटातली थरारक भुमिकीचे आजही कौेतुक केले जाते. हा चित्रपट 3डी असल्याने खूपच गाजला होता.(bollywood five bollywood actress who acted in horror movies and impressed audience read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण
प्राजक्ता उतरतेय उद्योगक्षेत्रात, राज ठारेंच्या हस्ते केले ‘या’ ब्रॅंडचे उद्घाटन

हे देखील वाचा