Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फीला भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहूण संतापले युजर्स; म्हणाले, ‘अटेंशन मिळवण्यासाठी…’

बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या ‘पठाण‘ चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणे पहिल्याच दिवसापासून चर्चेत आले. गाण्यात दीपिकाने भगवव्या रंगाची बिकिनी परिधान करून खळबळ उडवली. धार्मिक संस्थासह राजकिय आणि बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटींनी या गाण्यावर चांगलीच टिका केली. पुढे मेकर्स आणि दीपिका यांच्यावर भगव्या रंगाचा वापर करून धार्मिक लाेकांंच्या भावना दुखावल्याचा आराेप केला,ज्यानंतर सेन्सॉर बोर्डाने गाण्यात बदल करण्याच्या सूचना दिल्यात. या सगळ्या दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची किलर फिगर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

नवीन व्हिडिओमध्ये, उर्फी भगव्या रंगाचा मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घालून मुंबईच्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘बेशरम रंग’ हे गाणे वाजताना ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी प्रचंड हाॅट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. साेशल मीडिया युर्जस तिच्या ड्रेससाेबतच तिच्या लूकवरही चर्चा करत आहेत. युजर्सच्या म्हणण्यानुसार उर्फी विवाद वाढवण्यासाठी आणि अटेंशन मिळवण्यासाठी हे सर्व करत असल्याचे बालले जात आहेत.

उर्फीच्या व्हिडिओवर एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, “अरे, अजूण दुसरा काेणता रंग नव्हता का? जाे भगव्या रंगाचा अपमान करायला निघाली.”, तर दुसऱ्या युजरने ट्राेल करत लिहिले की,”बस कंट्रोवर्सीसाठी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत…अटेंशन पाहिजे फक्त”, यानंतर तिसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “पाेलिसांनी तर तुला मारहाण केली पाहिजे, मुद्दाम भगवा रंगाचा ड्रेस परिधान केला.”

अशाप्रकारे युजर्स उर्फीच्या या लेटेस्ट व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.(tv actress urfi javed showed her sizzling style in bhagwa rang revealing dress like deepika padukone and got trolled)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा

‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा