Saturday, July 6, 2024

नाद करा पण उर्फीचा कुठं! अभिनेत्रीने केली थेट चित्रा वाघ यांच्याविराेधात तक्रार दाखल

‘बिग बॉस’ ओटीटी फेम उर्फी जावेद अनेकदा तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. एकीकडे सोशल मीडियावर नेटिझन्स तिच्यावर निशाणा साधत असतात, तर दुसरीकडे काही लाेक तिच्या कपड्याची प्रशंसा करत असतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे. अशात दोघांचे भांडण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. जिथे आज म्हणजेच शुक्रवारी (दि. 13 जानेवारी)ला उर्फी जावेदने चित्रा वाघ यांनी दिलेल्या धमकीवरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय, अभिनेत्री मुंबईतील महाराष्ट्र महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर स्पॉट झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) आणि उर्फी जावेद (urfi javed) यांच्यातील नग्नतेबाबत वाद वाढत आहे. तर झाले असे की, यापूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच केल्याचा आरोप केला होता आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. उर्फीवर निशाणा साधत चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा नंगा नाच चालणार नाही. उर्फी जावेद जिथे – जिथे दिसेल तिथे ते तिला चिरडून टाकेल.” चित्रा यांची अशी धमकी ऐकून उर्फी जावेदलाही धक्का बसला आणि तिला प्रत्युत्तर देताना उर्फी जावेद म्हणाली होती की, “माझा नग्न नृत्य असाच चालू राहील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशा परिस्थितीत, आज म्हणजेच शुक्रवारी (दि. 13 जानेवारी)ला उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पत्र लिहून ऑनलाइनद्वारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सातपुते यांनी उर्फीवर चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे मॉब लिंचिंगचा धोका असल्याचे म्हटले आहे. यासोबतच उर्फीच्या वकिलानेही पोलीस कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, आता उर्फी जावेदचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये ती महाराष्ट्र महिला आयोगाच्या कार्यालयात जाताना दिसत आहे. तक्रार नोंदवल्यानंतर उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांना भेटण्यासाठी तेथे पोहोचल्याचे बोलले जात आहे.(tv actre`s`s urfi javed visits maharashtra woman commission office after filing case against bjp leader chitra wagh)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘फोर मोअर शॉट्स’ फेम मानवीने केला साखरपुडा, प्रसिद्ध कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत लवकरच होणार ‘या’ नवीन पात्राची एन्ट्री

हे देखील वाचा