Saturday, April 20, 2024

‘फोर मोअर शॉट्स’ फेम मानवीने केला साखरपुडा, प्रसिद्ध कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

फोर मोअर शॉट्स प्लीज‘ आणि ‘ट्रिपलिंग‘ सारख्या वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री मानवी गागारूने शुक्रवारी (दि. 13 डिसेंबर)ला एक पाेस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने एक पाेस्ट शेअर करत तिची एंगेजमेंट झाली असल्याचे सांगितले.

अभिनेत्री मानवी गागारू (maanvi gagroo) हिने इस्टाग्रामवर शेअर केलेल्या पाेस्टमध्ये तिची एंगेजमेंट रिंग दाखवली आहे. अभिनेत्रीने तिच्या एंगेजमेंटची बातमी तिच्या चाहत्यांना सांगताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनी तसेच सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांनीही मानवी गाग्रूला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanvi Gagroo (@maanvigagroo)

मात्र, या फाेटाेसाेबत मानवी गाग्रूने तिच्या हाेणाऱ्या नवऱ्याचे नाव जाहीर केले नाही आणि त्या दाेघांचा कोणताही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला नाही. या फोटोमध्ये ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ अभिनेत्री फक्त कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तिच्या एंगेजमेंटचा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अखेर हे झाले’.

मानवी गागारूने सोशल मीडियावर तिच्या मैत्रिणी आणि चाहत्यांसह ही बातमी शेअर करताच, अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. मानवीची जवळची मैत्रीण अभिनेत्री मौनी रॉयने मानवीला शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, “अगदी मनापासून तुला ‘अभिनंदन’.” तर ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री सृती झा हिला ही बातमी ऐकून धक्काच बसला आहे. मानवीच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने लिहिले, “अरे देवा, मला पूर्ण धक्का बसला आहे.”

अॅमेझॉन प्राइम वेब सीरिजमध्ये तिच्या मित्राची भूमिका करणाऱ्या बानी जे यांनी कमेंट करत लिहिले की, “अरे हॅलो, आम्हाला याबद्दल बर्याच काळापासून माहित होते, परंतु त्याचसाेबत आम्हाला हे देखील माहित होते की, आम्हाला या पोस्टसाठी प्रतीक्षा करावी लागेल.” या स्टार्सशिवाय सुमीत व्यास, शिबानी दांडेकर, सयानी गुप्ता, गजराज राव यांच्यासह अनेक टेलिव्हिजन आणि बॉलिवूड स्टार्सनी तिचे अभिनंदन केले.(four more shots fame maanvi gagroo show of her engagement ring mouni roy ahana kumar give best wishes)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन

‘तू लगावे जब लिपिस्टिक’ गाण्यावरील किली पॉलच्या व्हिडीओपुढे नेटकऱ्यांना पवनसिंग देखील वाटला फेल

हे देखील वाचा