Tuesday, June 18, 2024

उर्फीने हद्दच केली पार! अभिनेत्रीने ट्रांसपेरेंट ड्रेस घातलेला ‘ताे’ व्हिडिओ आला समाेर, युजर्सने केले ट्राेल

साेशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने प्रत्येक वेळी तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांचे होश उडवले असते. उर्फी काय परिधान करून समोर येईल याचा काहीही नेम नसताे. तुम्हाला तिचा फॅशन सेन्स आवडो किंवा न आवडाे, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दरम्यान, उर्फी पुन्हा एकदा तिच्या बाेल्ड लुकमुळे चर्चेत आली आहे, ज्यामुळे साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्राेल करत आहे.

उर्फी जावेद  (urfi javed) कायमच तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. दरम्यान, उर्फीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फिने ब्लॅक कलरचा ट्रांसपेरेंट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसच्या पुढच्या बाजूला ड्रॅगन बनवण्यात आला असून संपुर्ण ड्रेस जाळी सारखा आहे. अशात उर्फीला या लूकमध्ये पाहून चाहत्यांना उर्फी असे काही करू शकते यावर विश्वास बसत नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने ट्राेल करत कमेंटमध्ये लिहिले की, ‘उर्फीचे नाव गिनीज बुकमध्ये असावे.’ त्याचवेळी दुसर्‍या युजरने ट्राेल करत लिहिले की, “उर्फी यात खूपच वल्गर दिसत आहे.” अशात एका युजरने ट्राेल करत लिहिले की, “ती मच्छरदाणी घालून आली आहे.”  अशा अनेक कमेंट्स उर्फीच्या या व्हिडिओवर येत आहेत.

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली. (tv actress urfi javed weird transparent dragon dress fan now and brutally trolled her video goes viral on social media )

हे देखील वाचा