Monday, June 24, 2024

दुर्लक्ष करण्याच्या वादानंतर सलमान खानने स्वतः विकीकडे जाऊन त्याला मारली मिठी, व्हिडिओ झाला व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगताच येत नाही. अलीकडेच सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सलमान खान हा बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार आहे. केवळ भारतातच नाही तर देशभरात त्यांचे चाहते आहेत. सलमान खानचे स्टारडम असे आहे की, त्याच्यासमोर मोठे स्टार्स फिके पडतात. सध्या सलमान खान आणि विकी कौशलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सध्या सलमान आयफा 2023साठी अबू धाबीमध्ये आहे. राजकुमार, अभिषेक बच्चन, विकी कौशल आणि फराह खान देखील सलमानसोबत आयफा 2023 साठी पोहोचले आहेत. नुकताच अबू धाबीमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते संतापले आहेत. खरं तर, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, सलमानने त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफचा पती विकी कौशलला इग्नोर केल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सलमान खान आणि विकी कौशलचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते सलमान खानला ट्रोल करत आहेत. IIFA 2023 च्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी जाणार्‍या स्टार्सच्या या व्हिडिओमध्ये, सलमान खान विकी कौशलकडे दुर्लक्ष करत पुढे जाताना दिसत आहे, तर त्याच्या अंगरक्षकांनीही विकीला धक्काबुक्की केली आहे.

त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सलमान खान कतरिना कैफच्या नवऱ्याकडे म्हणजेच विकी कौशलकडे दुर्लक्ष करत असल्याच्या वादानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान विकीला मिठी मारताना दिसत आहे.

या सगळ्या दरम्यान विकी कौशलने या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिला दिली आहे. तो म्हणाला, ‘कधीकधी गोष्टी खूप वाढतात. त्यामुळे त्या गोष्टींबद्दल बोलणे मूर्खपणाचे आहे. सध्याची गोष्टी व्हिडिओमध्ये दिसल्यासारख्या नव्हती. या फालतू गोष्टींवर बोलण्यात काहीच अर्थ नाही. विकी कौशल यावेळी आयफा 2023 होस्ट करणार आहे. त्याचवेळी हा कार्यक्रम आणखी खास बनवण्यासाठी त्याच्यासोबत अभिषेक बच्चनही येणार आहेत. (Wawad Salman Khan-Vicky video viral)

हे देखील वाचा