Tuesday, August 5, 2025
Home टेलिव्हिजन ‘चित्रू, आपण दोघी लवकरच मैत्रिणी होऊ…’, उर्फी जावेदच्या पोस्टने घातला धुमाकूळ

‘चित्रू, आपण दोघी लवकरच मैत्रिणी होऊ…’, उर्फी जावेदच्या पोस्टने घातला धुमाकूळ

बिग बॉस OTT‘ नंतर प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद तिच्या अतरंगी शैली आणि बोल्ड आउटफिट्ससाठी ओळखली जाते. काही दिवसांपासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात जाेरदार वाद पेटला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका करत अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय त्यांनी उर्फी विरोधात पोलिस तक्रार केली असून काही झालं तरी उर्फीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. इतकचं नाही तर ती दिसल्यावर तिच्या कानशिलात वाजवणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद (Urfi Javed) हिने देखिल चित्रा वाघ यांना नवीन वर्षाचं आव्हान दिलं आहे. उर्फीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, “आपण लवकरच मैत्रिण बनणार आहोत चित्रू!”

उर्फी जावेदचा हा ट्विट साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. चाहते तिच्या या ट्विटवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आता तू पुढच्या बिग बाॅसमध्ये ये मज्ज येईल”, तर दुसऱ्या युजरने ट्विटरवर कमेंट करत लिहिले की, “उर्फी आग है ताे बाकी सब भंगार है.”

याधीही उर्फीने चित्रा वाघ यांना संजय राठोड यांची आठवण करुन त्यांच्या नावाने जूनं प्रकरण उखरुन काढले हाेते. पुजा चव्हान हिच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड विरोधात लढण्यासठी जिवतोड मेहनत घेत चित्रा वाघ मैदानात उतरल्या होत्या. त्याशिवाय संजय राठोड याला राजीनामा घ्या अशी टीका सरकारवर करत होत्या. मात्र, तरी देखील संजय राठोड यांना पूजा चव्हान प्रकरणातून क्लिनचिट मिळाली. अशात उर्फीच्या ट्वीटनंतर चित्रा वाघ कोणती भूमिका घेतील हे पाहाणे खूपच महत्वातचे ठरणार आहे. (tv actrss urfi javed chitra wagh bjp leader now trolled social media )

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुजलेले डोळे अन् विस्कटलेले केस, उर्फीची अवस्था पाहून चाहत्यांना मोठा धक्का

दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर

हे देखील वाचा