Sunday, April 14, 2024

‘बिग बॉस’च्या घरात श्रीजीता डेने खोलली टीना दत्ताची पोल म्हणाली, ‘हिला फक्त मुलांकडून…’

लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस 16 मध्ये अभिनेत्री श्रीजीता डे हिने वाइल्ड कार्ड एंट्री केल्यानंतर तिने थेट टीना दत्ता हिच्यावर निशाना साधत तिचे हृदय काळ आहे असं सांगितलं होतं. इथुनच या दोघींमध्ये वैर सुरु झाला होता. त्याशिवाय या दोघी समोर आल्यानंतर अनेकदा भांडातानाही दिसल्या. गुरुवार (दि, 22 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये श्रिजिताने टीनाबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे.

झाले असे की, सकाळी किचमध्ये टीना दत्ता (Tina Dutta) हिला शालिन भनोट (Shalin Bhanot) हग करतो. हे सगळं पाहात असताना श्रीजीता डे (Shrijita Day) आणि सौंदर्या शर्मा (Saundrya Sharma) एकत्र बसलेल्या असतात आणि शालिना आणि टीनाला पाहून सौंदर्या म्हणते की, “तुला तर खुप हसायला येत असेल टीनाला हे सगळं करत असताना.” यानंतर श्रीजीता म्हणते की, “टीनाने खूप लोकांचे घर तोडण्याचा प्रयत्न केला असून तिने आपल्या मित्रालाही सोडले नाही. त्यामुळेच स्वत:च घर नाही बनवू शकली आतापर्यत.”

श्रीजीता पुढे म्हणते की, “कर्मा बेब्स, तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा तिने सांगितले होते की,श्रिजिता प्रेम मिळवणं खूप कठीण असतं. एकदा आम्ही गोवा ट्रीपला गेले होतो, तेव्हा मला समजलं की, ही मुलगी खूप दु:खी मुलगी आहे. तेव्हा मी कान पकडले की, या मुलीसोबत कधीच कुठे नाही जाणार.” यानंतर सौंदर्या म्हणते की, “मला वाटत आहे की, ही त्या मुलिंपैकी आहे जी बाहेर गेल्यानंतर चुगल्या करत असेल आणि फिरायला गोल्यानंतरही गोष्टींचा आनंद लुटत नसेल.”

 

View this post on Instagram

 

श्रिजीता बोलता बोलता म्हणते की, “टीनाला एक फुल्ली लोडेड माणुस पाहिजे. तिला मुलांकडून काहीच त्रास नाही. फक्त तिला सगळ्यांकडून अटेंशन पाहिजे असतं. ती तिच्या हाईलटाला गेऊनही खूप जटिल आहे.” यानंतर सौंदर्या म्हणते की, “ही तीच आहे जी समोर बसून हसेल आणि पाठीमागे जाऊन चुगल्या करेल.” यानंतर श्रीजीता म्हणते की, “ती खूप नेगेटिव्हिटीने भरलेली आहे त्याशिवया ती खूप जळत असते.” या दोघींच्या गप्पामध्ये श्रीजीता घराबोहीरल टीनाच्या काही वैयक्तीक गोष्टींचा खुलासा करते. आता हे पाहाणे खूप महत्वाचे ठरेल की, सौंदर्या किंवा इतर कोणी या गोष्टीचा मुद्दा उचलेल का?

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रथमेशला लागलेत लग्नाचे डोहाळे, ‘ढिशक्यांव’ चित्रपटाने केलं स्वप्न पूर्ण
ब्रेकिंग! मनोरंजन क्षेत्रामधील दिग्गज कलाकार हरपला

हे देखील वाचा