Friday, July 5, 2024

बॉयफ्रेंड विकीच्या मांडीवर बसून अंकिताने दिली रोमँटिक पोज, सुशांतच्या चाहत्यांनी विचारला ‘हा’ प्रश्न

टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या खूप चर्चेत आहे. अंकिता नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिचे विविध ठिकाणच्या प्रवासाचे फोटो, तिची मतं इतर माहिती ती नेहमीच सर्वांसोबाबत शेयर करत असते. अंकिता तिच्या कामापेक्षा लव्हलाइफमुळे जास्त प्रकाशझोतात असते. नुकताच अंकिताने तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. आता ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत गोव्यात सुट्यांचा आनंद घेत आहे.

अंकिताने नुकतेच तिच्या गोवा वेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. विकीच्या मांडीवर बसलेली अंकिता या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे. विकी जैन आणि अंकिता या फोटोंमध्ये अतिशय रोमँटिक मूड मध्ये दिसत आहे. या फोटोत अंकिताने रेड फ्लोरल शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स घातले असून विकीने टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहेत. रोमँटिक लोकेशन आणि रोमँटिक मूड यांमुळे त्यांचे हे फोटो अधिक खास झाले आहेत. त्यांच्या या फोटोंवर फॅन्सच्या भरभरून कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत.

अंकिताने पोस्ट केलेल्या या फोटोना ‘आम्ही एक परिवार आहोत, कोणा कोणाला पुन्हा गोव्याला जायला आवडेल? हात वर करून सांगा’. असे कॅप्शन देखील दिले आहे. अंकिताने या फोटोसोबतच इतरही काही फोटो शेयर केले आहे. ज्यात अंकिताची आणि विकीची संपूर्ण फॅमिली सोबत दिसत आहे.

अंकिता आणि विकीच्या फोटोवर काहींनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या तर काहींनी सुशांतच्या मृत्यूच्या काही महिन्यातच अंकिता अशी फिरू कशी शकते? आदी प्रश्न विचारून तिला ट्रोल देखील केले आहे.

अंकिताने नुकताच तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केल्यामुळे देखील अंकिता सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणत ट्रोल झाली.

अंकिताने नुकतेच झी टीव्हीच्या पुरस्कार समारंभात सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली देण्यासाठी एक परफॉर्मन्स देखील सादर केला. त्यात तिने सुशांतसाठी म्हंटले होते की, सुशांत तुझे आणि माझे नाते पवित्र नाही तर अमर आहे. या ट्रिब्युटमध्ये अंकिताने सुशांतची जर्नी दाखवली होती.

हे देखील वाचा