कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Tv anirudha dave wife shubhi ahuja rushes to hospital leaving their 2 month old baby behind at home


आजकाल अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता या यादीत ‘पटियाला बेब्स’ फेम टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवेचे नावही सामील झाले आहे. अनिरुद्ध दवेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले होते की, तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

अनिरुद्धने २३ एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने आपल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची माहिती सर्वांना दिली होती. आता अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. ज्यामुळे त्याचे चाहते आणि त्याचे कुटुंब बरेच चिंतेत आहेत.

दरम्यान, अनिरुद्ध दवेची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री शुभीने तिच्या पतीसाठी, एक अतिशय खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर अभिनेत्याचे चाहते आणि त्याचे मित्र खूप भावुक झाले. या पोस्टसोबतच शुभीने, अनिरुद्धच्या प्रकृतीविषयीही एक अपडेट दिली आहे. तिने अनिरुद्धचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या दोन महिन्यांच्या मुलासोबत दिसला आहे.

अनिरुद्धचा हा फोटो शेअर करत शुभीने पोस्टमध्ये लिहिले, “मी अनिरुद्धला भेटायला जाणार आहे. अनिरुद्धची तब्येत या दिवसांत ठीक नाही, तो कोरोनाविरूद्ध आपला लढा देत आहे. तो रुग्णालयात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मला माझा २ महिन्यांचा मुलगा अनिश्कला घरी ठेवूनच जावे लागत आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ आहे. जेथे एकीकडे आमचा मुलगा अनिश्कला आमची गरज आहे, कारण तो अजून खूपच लहान आहे, तर दुसरीकडे मला अनिरुद्धला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे.”

तिने पुढे लिहिले, “कृपया प्रार्थना करा. मी माझे कुटुंब, परिचित, मित्र आणि अनिरुद्धच्या सर्व चाहत्यांना असे सांगू इच्छिते की, प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रार्थना करावी. तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करा. यावेळी, अनिश्कचे वडील अनिरुद्ध यांना, तुमच्या प्रार्थनेची खूप आवश्यकता आहे. आपण सर्वांनी मिळून प्रार्थना केली, तर तो लवकरच बरा होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘कपडे काढ, मग कळेल तू भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही!’ ग्लॅमरच्या विश्वाबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.