‘बालिका वधू’ या मालिकेतून चर्चेत आलेली अभिनेत्री अविका गोर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना स्वतःबद्दल माहिती देत असते. अलीकडेच अभिनेत्रीने स्वतः मध्ये असा बदल घडवून आणला आहे की, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या आश्चर्यकारक ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे वजन तर खूपच कमी झाले आहे, पण ती पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस झाली आहे. तिचे झालेले परिवर्तन पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अभिनेत्रीने अनेक किलो वजन केले कमी
अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहते तिला पाहून घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये अविका गोर खूपच स्लिम दिसत आहे. जे पाहून हे स्पष्ट होते की, अभिनेत्रीने तिचे वजन अनेक किलोने कमी केले आहे.
प्रत्येक लूकमध्ये करतेय कहर
अविका गोरने (Avika Gor) इंस्टाग्रामवर एक-दोन नव्हे, तर अनेक फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमधील अविकाचा लूक पाहून सगळेच तिच्या स्टाईलचे वेड लागले आहेत. काही फोटोंमध्ये अभिनेत्री जीन्ससोबत क्रॉप टॉप घातलेली दिसतेय, तर काही फोटोंमध्ये जॅकेटची चेन थोडी उघडून पोझ देताना दिसली.
https://www.instagram.com/p/Cad7z2PPVah/?utm_source=ig_web_copy_link
चाहते करत आहेत कौतुक
अभिनेत्रीचा हा लूक पाहून चाहते सतत कमेंट करत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “व्वा.. हा जबरदस्त लूक आहे.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “खूप सुंदर.” आणखी एका युजरने लिहिले की, “काय अप्रतिम परिवर्तन आहे.” दुसऱ्या युजरने कमेंट केली की, “स्टनिंग.”
‘या’ व्यक्तिरेखेमुळे मिळाली ओळख
अविका गोरला (Avika Gor) २००८ मध्ये आलेल्या ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) या मालिकेतून ओळख मिळाली. या मालिकेत अविकाने आनंदीच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय अविकाच्या ‘ससुराल सिमर का’ मधील रोलीचे पात्र खूप प्रसिद्ध झाले होते. यानंतर ही अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये दिसली. पण या पात्रांना ती प्रसिद्धी मिळाली नाही. याशिवाय अविका गौर अनेक तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्येही दिसली आहे.
छोट्या पडद्यावर आपली जादू चालवल्यानंतर अविकाने बॉलिवूड चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत. तिने ‘मॉर्निंग वॉक’ (२००९), ‘पाठशाला’ (२०१०) आणि ‘तेज’ (२०१२) मध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने ‘उय्याला जामपाला’ (२०१३) मधून तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून ती कन्नड चित्रपटांमध्येही दिसणार आहे.
हेही वाचा –
- ‘झांसी की रानी’ मालिकेतील छोटी मनू आठवते का? झालीये खूपच ग्लॅमरस
- मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या वर्षा उसगांवकर तब्बल ३६ वर्षांनी करणार रंगभूमीवर पदार्पण
- अभिज्ञा भावेचा पती देतोय कर्करोगाला झुंज, सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती