‘बालिका वधू’ फेम अविका गौरने नाकारली फेअरनेस क्रीमची जाहिरात; म्हणाली, ‘गोरेपणा म्हणजे सुंदरता नव्हे’


टेलिव्हिजनवरील ‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अविका गौर. ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे अविकाने एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला नकार देऊन तिच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.

तिचे असे म्हणणे आहे की, “आता या सगळ्या क्रीमची अशी जाहिरात बनवली जात आहे की, लोकांना‌ सुंदरता म्हणजे फक्त गोरा रंग असेच वाटते. परंतु मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाहीये. अविकाने तीन फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास नकार दिला आहे.”

एका मुलाखतीत अविकाने सांगितले की, “मी या फेअरनेस क्रीमची जाहिराती करणार नाही. या क्रीमने सगळ्यांच्या मनात हा भ्रम निर्माण केला आहे की, सुंदरता म्हणजे केवळ गोरा रंग आणि यातच यश आहे. परंतु मी या सगळ्या गोष्टीशी अजिबात सहमत नाहीये. आत्मविश्वास हा आपल्या कामाच्या नैतिकतेची आणि ज्ञानाशी असतो. या समाजात आपण एका रंगाला आदर्श नाही मानत. माझ्या मते हे आता बदलले पाहिजे.”

अविकाला काही दिवसांपूर्वी काही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर आली होती. पण तिने त्या ऑफर नाकारल्या होत्या. तिला या अशा जाहिराती करायला अजिबात आवडत नसल्याचे तिने सांगितले होते.

तिचे असे म्हणणे आहे की, समाजात कोणत्याच रंगाचा भेदभाव नाही केला पाहिजे. तिने पुढे सांगितले की, “मला या विचारात बदल करायचा आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल करायचा आहे. या जाहिरातीमुळे मला किती पैसे मिळतील हा विषय वेगळा आहे. पण अशा गोष्टीमुळे समाजावर चुकीचा प्रभाव पडतो. त्यामुळे मी या जाहिराती करण्यास नकार दिला आहे.”

नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे एक व्हिडिओ साँग प्रदर्शित झाले होते. या व्हिडिओमध्ये ती आदिल खानसोबत दिसली होती. अविका कौरला ‘बालिका वधू’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली.

ती सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तिथे देखील तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिचे कोणतेही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.