Thursday, January 2, 2025
Home टेलिव्हिजन वाह!’बिग बाॅस’ फेम प्रिया मालिक अडकली लग्न बंधनात, नवऱ्यासाेबत एअरपाेर्टवर झाली स्पाॅट

वाह!’बिग बाॅस’ फेम प्रिया मालिक अडकली लग्न बंधनात, नवऱ्यासाेबत एअरपाेर्टवर झाली स्पाॅट

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस’ सीझन 9′ ची स्पर्धक असलेली अभिनेत्री प्रिया मलिक ‘शीर कोरमा’ आणि ‘काली-काली आंखे’ या सारख्या ओटीटी मालिकांमध्ये दिसली आहे. प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉसच्या घरात स्पर्धक असताना प्रियाचे किश्वर मर्चंटसोबत जोरदार भांडण झाले होते, त्या दिवसांमध्ये प्रिया खूप चर्चेत आली होती. मात्र, त्यानंतर दोघांची मैत्री झाली. प्रियाने या रविवारी (दि. 2 ऑक्टाेबर)ला करण बक्षीसोबत लग्न केले. अभिनेत्री तनाज इराणीसह अनेक सेलिब्रिटींनी प्रियाला तिच्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रिया मलिक (priya malik) आणि करण बख्शी (karan bakshi) मुंबई एअरपाेर्टला साेबत स्पाॅट झाले. प्रिया करणसाेबत खूप आंनदी दिसत हाेती. तिने हातात लाल रंगाचा चूडा आणि गुलाबी रंगाचा ड्रेस परीधान केला हाेता त्यासाेबतच तिने गुलाबी रंगाची मॅचिंग सॅंडल ही घातली हाेती, तर करणने ब्लॅक ट्राउजर, ब्लॅक सदरी आणि ब्राउन रंगाचा शर्ट घातला हाेता. दाेघांनीही पॅपराजीला आनंदात पाेज दिल्यात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिल्ली झाले प्रिया- करणचे लग्न
प्रिया मलिक आणि करण बक्षी हे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखतात. 2019 मध्येच दोघांनी एंगेजमेंट केली हाेती, आता ते लग्न बंधनात अडकले आहे. प्रियाने या रविवारी दिल्लीतील ग्रेटर कैलास येथील गुरुद्वारामध्ये शीख रितीरिवाजांनुसार लग्न झाले. याआधी 7-8 ऑक्टोबरला दोघांनीही कुटुंब आणि मित्रांसोबत मेहंदी, संगीत आणि कॉकटेल पार्टीचा आनंद लुटला होता. लग्नानंतर आता हे नवविवाहित जोडपे दिल्लीहून मुंबईत पोहोचले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रिया आणि करण मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

प्रियाच करणसाेबत आहे दुसर लग्न
प्रिया मालिकचे करण बख्शीसाेबत हे दुसरे लग्न आहे. याआधी प्रियाने भूषण मलिक साेबत लग्न केले हाेते. मात्र, 2018 मध्ये ते विभक्त झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस फेम अब्दू रेजिक 5 वर्षाचा असताना ‘या’ घातक अजाराला पडला होता बळी, अभिनेत्यानेच स्वत:च केला खुलासा

दमदार एन्ट्री! अश्विनी यार्डीच्या बर्थडे पार्टीत सिद्धार्थसाेबत पाेहचली कियारा, पाहा भन्नाट व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा