Birthday | युविका चौधरीने शाहरुख खानसोबत केलीय स्क्रीन शेअर, तर ‘बिग बॉस’च्या घरात मिळालं तिला खरं प्रेम

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री युविका चौधरीची (Yuvika Chaudhary) इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे. अभिनेत्री दरवर्षी २ ऑगस्टला तिचा वाढदिवस साजरा करते. अशातच, यावर्षी अभिनेत्री तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत येथील रहिवासी असलेल्या युविकाचा जन्म २ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नाव कमावणारी युविका प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्येही दिसली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी.

युविका चौधरी अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. तिने ‘अस्तित्व – एक प्रेम कहानी’, ‘दफा ४२०’, ‘कुमकुम भाग्य’, ‘बिग बॉस ९’ आणि ‘लाल इश्क’ सारख्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती २००७ मध्ये फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातही दिसली होती. याशिवाय तिने ‘तो बात पक्की’, ‘याराना’, ‘अफ्रा-ताफरी’, ‘समर २००७’ आणि एका पंजाबी चित्रपटातही काम केले आहे. (yuvika chaudhary birthday know about her)

युविका चौधरीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ती तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. तिने अभिनेता प्रिन्स नरुलासोबत लग्न केले आहे. ‘बिग बॉस ९’ सीझननंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये दोघांनी सात फेरे घेतले. याआधी ती अभिनेता विपुल रॉयसोबत दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होती, मात्र नंतर दोघे वेगळे झाले.

टीव्हीच्या लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये प्रिन्स आणि युविकाची प्रेमकहाणी सुरू झाली, त्यानंतर दोघांनी लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाला टीव्ही जगतापासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्स पोहोचले होते. दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि क्यूट कपलपैकी एक आहेत. त्यामुळेच दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याच वेळी, आता युविका आणि प्रिन्स लवकरच ‘नच बलिए १०’ हा डान्सिंग रियॅलिटी शो होस्ट करणार आहेत.

हेही वाचा

Latest Post