Monday, July 1, 2024

रस्त्यावर गाणे गाऊन घरचा खर्च चालवणारा अब्दु आज जगतोय लक्झरी आयुष्य

लोकप्रिय कार्यक्रमट ‘बिग बॉस 16‘ सध्या खूपच जोरदार धमाक्याने पार पडत आहे. घरातील प्रत्येक सदस्याची खरे चेहरे बाहेर आलेले दिसून येत आहे. प्रत्येकजन आपली कंभर कसून कार्यक्रम जिंकण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र, पूर्वी पासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा परदेशिय अब्दु रोजिक याने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. आपल्या भोळ्या स्वभावाने प्रेक्षकच नाही तर घरातील सदस्यदेखिल अब्दुचे फॅन झाले आहेत. त्याने केवळ भारतातच नाही तर देशभरात लोकांवर छाप सोडली आहे.

सिंगर अब्दु रोजिक (Abdu Rozik) प्रेक्षकांचा ऐवढा लाडका बनला आहे की, लोक त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक  खूपच अत्सुक असातात. अब्दु मुळचा ताजिकीस्तानचा आहे. तो त्यांच्या देशामध्ये सर्वात लहान सिंगर म्हणून ओळखला जातो. तो बिग बॉसमध्ये येण्यापूर्वीच त्याच्या फनी व्हिडिओमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. आता मात्र, अब्दु त्याच्या लक्झरी लाईफसाठी ओलखला जातो मात्र, कोणाला माहीत आहे का? ऐकेकाळी त्याने खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

नुकतंच अब्दुचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या कठीण परिस्थितीच्या दिवसातला आहे. अब्दुचे लहाणपन खूप गरिबीमधून गेले आहे. त्याच्या घरातील परिस्थिती हालाकीची असल्याने त्याने लहान वयातच रस्त्यावर गाणे गाऊन घर खर्च भागवण्यास  सुरुवात केली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अब्दु एका फळांच्या दुकानासमोर उभा राहून गाणे म्हणताना दिसून येत असून त्याला लोक पैसे देताना दिसून येत आहेत. भले अब्दु वयाने आणि उंचीने लहान असला तरी त्याने आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने जगामध्ये लोकप्रियता मिळवली आहे. त्याला बिग बॉसचा स्पर्धक होण्यसाठी निमंत्रण मिळाले होते.

अब्दुने बिग बॉसच्या घरातही साजिद खान सोबत आपल्या घरातील कठीण परिस्थितीचा उल्लेख केला होता. त्याने सांगितले की, आमच्याकडे राहण्यासाठी घरही न्हवते, पावसाळ्याच्या दिवसात छतावरुन पाणी टपकायचे, हळुहळू जेव्हा मी माझी ओळख निर्माण झाली झाली आणि मला काम मिळू लागलं तेव्हा माझे आयुष्य थोडे सुधारले. मग मी माझ्या कुटुंबासाठी एक घर विकत घेतलं, आता मी आणखी एक घर निकत घेण्याचा विचार करत आहे.

अब्दू आता जरी लक्झरी लाइफ जगत असला तरी तो त्याचे बालपणीचे दिवस विसरलेला नाही. ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खान सोबत बोलताना अब्दूने त्याच्या वाईट दिवसांचा उल्लेख केला होता. आमच्याकडे राहण्यासाठी घरही नाही, पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती बिकट होते, छतावरून पाणी टपकत असायचे असे अब्दूने सांगितले होते. हळूहळू जेव्हा माझी ओळख निर्माण झाली आणि मला काम मिळू लागलं, तेव्हा माझं उत्पन्नही चांगलं झालं. मी माझ्या परिवारासाठी एक छान घर विकत घेतलं आहे. आता मी आणखी एक मोठे घर घेण्याचा तो विचार करत आहे’. वडिलांना मोठे घर विकत घेऊन ते देण्याची त्याची इच्छा त्याने स्वबळावर पुर्ण केली.” असे अब्दुने साजिदला सांगितले

अब्दु लोकांना माणुसकीचा आणि संवेदनशिल राहण्याचा संदेश देत शिकवून जातो. तो जसा आहे त्यामध्येच खूश आहे. त्याने आपल्या कौशल्याने आणि साध्या स्वभावाने लोकांचा विश्वास जिंकला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिली’च्या स्क्रिनिंगमध्ये एथनिक ड्रेसमध्ये दिसली जान्हवी, पण रेखानेच लुटली वाह वाह, पाहा व्हिडिओ
अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिचं हटके फोटोशूट!

हे देखील वाचा