‘बिग बॉस 16‘च्या फिनालेमध्ये लढत असलेल्या शालीन भानाेतसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शालीन भानोतची एक्स वाईफ दलजीत कौर हिचा साखरपुडा झाला असून ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
शालीनची एक्स वाईफ दलजीत कौर (dalljiet kaur) पुन्हा एकदा लग्नासाठी सज्ज झाली आहे. तिने ब्रिटनमधील एका बिझनेसमॅनशी एंगेजमेंटही केली आहे. अशात अभिनेत्री मार्च 2023मध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. शालीनसोबत अपमानास्पद संबंध असलेल्या दलजीतला जीवनाने दुसरी संधी दिली आहे. यावर्षी मार्च महिन्यात तिचे लग्न होणार आहे.
दलजीतचा मंगेतर निखिल पटेल एका फायनान्स कंपनीत काम करतो आणि यूकेमध्ये सेटल आहे. लग्नानंतर दलजीतही तिचा आणि शालीनचा मुलगा जेडेनसोबत यूकेला शिफ्ट होणार आहे. त्यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले की, ‘लग्न मार्चमध्ये आहे. सुरुवातीला मी काही वर्षांसाठी नैरोबी (आफ्रिका) येथे जाईन. कारण, निखिल सध्या तिथे काम करत आहे, नंतर आम्ही लांडोरला शिफ्ट होऊ. दलजीत बिग बॉसमध्येही दिसली होती, पण तिचा प्रवास लवकरच संपला. याशिवाय ती काही टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे.

सलमानने आधीच दिली हिंट
सलमान खान जेव्हा शालीन आणि टीनाला फटकारत होता, तेव्हा त्याने शालीनला हातवारे करून इशारा केला आणि म्हणाला, ‘तू स्वतःबद्दल विचार कर, दिलजीत तिच्या आयुष्यात आनंदी आहे आणि तिला तिचे प्रेम मिळाले आहे. यावर शालीनचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. तो खोटा हसत म्हणाला, ‘मी दलजीतसाठी खुश आहे.’
View this post on Instagram
दलजीत कौर हिच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘मानाे या ना मानाे’, ‘रात हाेने काे है’, ‘इस प्यार काे क्या नाम दू’, ‘काला टिका’, ‘बिग बाॅस 13’ यासारख्या दमदार मालिकेत काम केले आहे. (tv bigg boss 16 shalin bhanot ex wife dalljiet kaur got engaged will tie knot to uk based nikhil patel)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लगीन घाई! सिद्धार्थची वधू कियारा अडवाणी जैसलमेरसाठी रवाना, विमानतळावर झाली स्पाॅट
पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात सापडली सपना चाैधरी, अभिनेत्रीवर भावाच्या पत्नीनेच केला गुन्हा दाखल