Monday, July 15, 2024

बाबाे! शिव ठाकरे अन् शालीन भानोत यांच्यात झाले जाेरदार भांडण, पाहा व्हायरल व्हिडिओ

बिग बॉस 16‘ च्या वीकेंड का वार हा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये शिव ठाकरे आणि शालीन भानोत यांच्यात जाेरदार वाद हाेत असताना दिसत आहे. दोघेही वादा दरम्यान एकमेंकाना बाेलायला कमी करत नाही. एकमेकांची चरबी कमी करण्यापासून ते चरबी काढून दाखव इतपर्यंत दाेघांमध्ये बाचाबाची पाहायला मिळत आहे. या दोघांमधील वादाचा हा व्हिडिओ कलर्स टीव्हीने साेशल मीडियावर शेअर केला असून त्याच्यावर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहे.

व्हिडिओमध्ये बिग बाॅस स्पर्धक शिव ठाकरे (shiv thackeray) आणि शालीन भानाेत (shaleen bhanot) यांच्यात जाेरदार वाद पाहायला मिळत आहे. वादादरम्यान दोघेही एकमेकांची चरबी कमी करण्याबाबत बोलत आहेत. शिव ठाकरे शालीन भानोतला म्हणताे की, “मला चरबी उतरवनही येते आणि हसणही काढता येते.” यावर शालीन भानोत म्हणताे की, “चरबी काढून दाखव.” या व्हिडिओवर युजर्सच्या विविध कमेंट्स येत आहे.अनेकांनी शिवची बाजू घेतली आहे, तर अनेकांनी शालीनची बाजू घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सलमान खानला डेंग्यू झाल्यामुळे यावेळी बिग बॉस वीकेंड का वार हा कार्यक्रम करण जोहर होस्ट करत आहे. त्याने अनेक स्पर्धकांसोबत मनोरंजक खेळही खेळले आहेत. त्याच वेळी, तो स्पर्धकांना केजो सिटीमध्ये बोलावून विविध टास्क करून घेतो, या टास्कला खूप पसंत केले जात आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांनीही त्यांच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस 16 मध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये गोरी नागोरी, प्रियांका चौधरी, अंकित गुप्ता, शालीन भानोत, साजिद खान, अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांचा समावेश आहे. प्रत्येकजण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. या शोमध्ये अनेक नवे ट्विस्ट आणि टर्न्सही येत आहेत. बिग बॉस 16 मध्येही अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सर्वांनाच हा शो पूर्णपणे आवडत नाही. त्यामुळे या शोमध्ये अनेक लढायाही पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जगावेगळंच! मल्लिका लवकर झोपते म्हणून बॉयफ्रेंडला असते ‘ही’ तक्रार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’

हे देखील वाचा